पवित्र रमजानला आजपासून सुरूवात

By Admin | Updated: June 19, 2015 01:15 IST2015-06-19T01:15:22+5:302015-06-19T01:15:22+5:30

इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आज (शुक्रवार) पासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्यातील तीस दिवस रोजे (उपवास) सुरू होणार

The holy Ramadan begins today | पवित्र रमजानला आजपासून सुरूवात

पवित्र रमजानला आजपासून सुरूवात

पुणे : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आज (शुक्रवार) पासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्यातील तीस दिवस रोजे (उपवास) सुरू होणार असल्याची घोषणा हिलाल कमिटीने (चॉँद कमिटी) केली.
गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे शुक्रवारपासून रमजानला प्रारंभ होत असल्याचे हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना कारी मेहताब यांनी सांगितले. या बैठकीला मौलाना गुलाम अहमद कादरी, मौलाना कारी ईद्रीस, मौलाना मुफ्ती अहमद कासमी, मौलाना हाफिज ईद्रीस, मौलाना गुलाम दस्तगीर खान, सिरत कमिटीचे रशीद खान, सिराज बागवान, सय्यद अल्ताफ, रशीद एन. आर. इकबाल शेख, ईसहाक जाफर, इस्माईल चौधरी आणि वहीद खान उपस्थित होते.

Web Title: The holy Ramadan begins today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.