शंभूराजेंचा इतिहास पुढे यावा
By Admin | Updated: March 16, 2015 22:25 IST2015-03-16T22:25:19+5:302015-03-16T22:25:19+5:30
संभाजीमहाराजांच्या जन्माने पवित्र झालेली ही पुरंदरची भूमी आहे. छत्रपती संभाजीमहाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नारायणपुरात साहित्याची गंगा आली आहे.

शंभूराजेंचा इतिहास पुढे यावा
नारायणपूर : संभाजीमहाराजांच्या जन्माने पवित्र झालेली ही पुरंदरची भूमी आहे. छत्रपती संभाजीमहाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नारायणपुरात साहित्याची गंगा आली आहे. या माध्यमातून संभाजीमहाराज यांचा खरा इतिहास जनतेपुढे आला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष क्रांतिकारी कवी आकाश सोनवणे यांनी केले.
नारायणपूर (ता. पुरंदर) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या संमेलनाचे उद्घाटन सद्गुरु नारायणमहाराज यांचे शिष्य भरत क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी स्वागताध्यक्ष म्हणून रमेश इंगळे उपस्थित होते. सुनील धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलनस्थळी आणण्यात आली. या ज्योतीचे स्वागत रमेश इंगळे यांनी केले.
या वेळी निमंत्रक प्रशांत पाटणे, सुनील धिवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सरपंच भारती खोरगडे, संग्राम सस्ते, नीलेश जगताप, बापूसाहेब कटके, सुजाता गुरव, विमल सोनवणे, राहुल कांबळे, योगेश कांबळे, स्वप्नील धिवार, युवराज इंगळे, म्हस्कू इंगळे, रणजित भंडारी, पप्पू धिवार, एस. एस. कोडीतकर आदी उपस्थित होते.
संमेलनाचे संयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव, उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पुणे जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्ता भोंगळे, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, संघटक नंदू दिवसे, सासवड शहराध्यक्ष गणेश मुळीक,
निरीक्षक चंद्रकांत टिळेकर,
छाया नानगुडे, सुनील वढणे आदींनी केले.
नारायणपूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर, भरत क्षीरसागर, शांताराम कुंजीर, बाबासाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील लोणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
४नव्या साहित्यिकांना उभारी देण्याचे काम साहित्य परिषद करते. या माध्यमातून साहित्याची एक मोठी पिढी उभी राहते आहे. साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेत संमेलन घेण्यामागची भूमिका दशरथ यादव यांनी मांडली.
४विचारातच मोठी ताकद आहे. म्हणून हे विचार संमेलनाच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे शरद गोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. संभाजीमहाराजांच्या संमेलनासाठी सातत्याने मदत केली जाईल, असे रमेश इंगळे यांनी स्वागतपर मनोगतात सांगितले.