शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काॅफीटेबल बुकद्वारे उलगडला पुण्याच्या गणेशाेत्सवाचा इतिहास; ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’चे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 13:54 IST

पाेलिस उपायुक्त विजय मगर; ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’ या गणेशाेत्सवावरील काॅफीटेबलचे प्रकाशन...

पुणे : ‘गणपती हे पुण्याचे आराध्य दैवत मानले जाते. या गणेशाेत्सवाविषयीचे ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’ हे काॅफी टेबल बुक गणेशाेत्सवाचा इतिहास उलगडणारे महत्त्वाचा दस्तावेज आहे,’ असे मत पुण्याच्या वाहतूक विभागाचे पाेलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी व्यक्त केले.

‘पुनित बालन ग्रुप’ प्रस्तुत व लाेकमतच्या ‘ती’चा गणपती उत्सवाअंतर्गत ‘लाेकमत - पुण्याचा लाेकाेत्सव’ या पुण्यातील गणेशाेत्सवावर आधारित काॅफीटेबल बुकचे बुधवारी (दि. २७) प्रकाशन झाले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी पुनित बालन ग्रुपचे प्रमुख आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनित बालन, ‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे आदी उपस्थित हाेते. या काॅफीटेबल बुकच्या निर्मितीत न्याती ग्रुपचे सहकार्य लाभले.

गणेशाेत्सव सुरू करताना भाऊसाहेब रंगारी आणि लाेकमान्य टिळकांची भूमिका याबराेबरच पर्यावरणपूरक गणेशाेत्सव अशा अनेक मुद्द्यांचा समावेश असलेले हे काॅफीटेबल बुक हे गणेशाेत्सवाचा संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास संजय आवटे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.....

पुण्यातील गणेशाेत्सवाची अगदी प्रारंभापासून माहिती देणाऱ्या काॅफीटेबलचे प्रकाशन करताना खूप आनंद हाेत आहे. हे काॅफीटेबल तयार करण्यात ‘लाेकमत टीम’चा माेलाचा वाटा राहिला आहे. या काॅफीटेबलमधून गणेशाेत्सवाचा पूर्ण इतिहास समाेर आणण्याबराेबरच पुण्यामध्ये गणेशाेत्सवाची पायाभरणी भाऊसाहेब रंगारी आणि लाेकमान्य टिळक यांनी कशी आणि का केली, याविषयीचा उलगडाही यातून झाला आहे. गणेशाेत्सव या पुण्याच्या लाेकाेत्सवाची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल लाेकमतचे मन:पूर्वक आभार!- पुनित बालन, विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

लाेकमतच्या विविध उपक्रमांत न्याती ग्रुप नेहमीच सहभागी असते. लाेकमत ‘ती’चा गणपती उपक्रमाअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या काॅफीटेबल बुकमध्ये आम्हाला याेगदान देता आले, याचा खूप आनंद आहे. यातून गणेशाेत्सवाविषयी पूर्ण मराठीतून माहिती देणारा दस्तऐवज सामान्यांपर्यंत पाेहाेचला आहे.

- हरीश श्राॅफ, संचालक, न्याती ग्रुप, सेल्स ॲंड मार्केटिंग

टॅग्स :LokmatलोकमतPuneपुणे