शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महत्त्वाच्या संस्थांचा इतिहास जाेपासायला हवा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 17:57 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

पुणे : अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या संस्थांची माहिती देणारे संग्रह, संस्थेचा इतिहास याचे जतन केले जाते. आपल्या देशात संस्थांचा इतिहास फारासा संभाळला जात नाही. महत्त्वाच्या संस्थांचा इतिहास जाेपसायला हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापाैर मुक्ता टिळक, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभाेर आदी मंचावर उपस्थित हाेते. 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाेगतात संघाने तयार केलेल्या काॅफीटेबल बुकचे काैतुक केले. तसेच पत्रकारांच्या विविध समस्यांवर सरकारकडून उपाययाेजना करण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, अनेक संस्था माेठं काम करतात. परंतु त्यांचा इतिहास जाेपासणं हे आपल्या देशात फारसं सांभाळलं जात नाही. जगातील प्रत्येक संस्थेमध्ये संस्थेची आठवण, प्रवास जतन करुन ठेवला जाताे. ही आठवण संस्था कुठल्या धाेरण, ध्येय्य करता उभी केली, तिची वाटचाल काय आहे ? तिचा संघर्ष काय आहे ? या गाेष्टीची माहिती देत असते. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना संस्थेचे मूळ तत्त्व कायम राखण्याकरीता ही आठवण मदत करत असते. संघर्षाच्या प्रसंगात ही आठवण महत्त्वाची असते. त्यातून मार्ग मिळत असताे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास माेठा आहे. स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आधुनिक काळ हा या पत्रकार संघाने पाहिला आहे. व्यवस्थेला हलविणाऱ्या अनेक दिग्गज पत्रकारांचा इतिहास या संघाशी जाेडला गेलेला आहे. 

पत्रकारांसाठी सरकारने तयार केलेल्या याेजनांबाबत फडणवीस म्हणाले, 25 काेटी रुपये हे पत्रकारांच्या पेन्शनसाठी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच महात्मा फुले आराेग्य याेजनेअंतर्गत पत्रकारांना माेफत उपचार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाबाबत म्हाडाच्या माध्यमातून खास याेजना  सरकार तयार करेल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

गिरीश बापट म्हणाले, पत्रकार संघ हा केवळ बातम्या देणारा संघ नाही तर प्रबाेधन  देखील करणारा संघ आहे. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात पत्रकार संघाचे माेठे याेगदान आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेgirish bapatगिरीष बापट