अन् निकालातही घडला इतिहास

By Admin | Updated: February 24, 2017 02:26 IST2017-02-24T02:26:36+5:302017-02-24T02:26:36+5:30

मंचर पंचायत समिती गणात इतिहास घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले

History also happened | अन् निकालातही घडला इतिहास

अन् निकालातही घडला इतिहास

मंचर : मंचर पंचायत समिती गणात इतिहास घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी ४७३ मतांनी विजय संपादन करीत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले. तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना यांच्यात लढत रंगली असताना बाणखेले यांनी जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या व शिवसेनेचा उमेदवार तब्बल तिसऱ्या स्थानावर राहिला.
आंबेगाव तालुक्यात १९७२ मध्ये माजी खासदार किसनराव बाणखेले जिल्हा परिषदेला अपक्ष निवडून आले होते. पंचायत समितीला अपक्ष उमेदवार यापूर्वी कधीही निवडून आला नव्हता. मात्र या वेळी इतिहास घडला. अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विजयश्री अक्षरश: खेचून आणली. मंचरची अस्मिता व स्वाभिमान या दोन मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक लढविली. फारसा जाहीर प्रचार न करता तसेच खर्च न करताही राजाराम बाणखेले यांनी मिळविलेले यश आज चर्चेचा विषय झाला आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यावर बाणखेले अपक्ष उभे राहिले. त्यांची शिवसेनतून हकालपट्टीसुद्धा झाली. मात्र बाणखेले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मंचरकरांमध्ये निर्माण झाली. त्यामुळेच त्यांना सर्वपक्षीय मतदान मिळाले आहे. त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला झालेली गर्दी बरेच काही सांगून गेली. या सभेत बाणखेले यांनी भावनिक आवाहन केले. मंचर ही तालुक्याची राजकीय राजधानी आहे. येथील जागा मागच्या वेळी राष्ट्रवादीने जिंकली होती. या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीने विजयासाठी प्रयत्न केले. मात्र मतदारांची सहानुभूती बाणखेले यांच्याकडे होती. मंचर शहरात फिरताना राजारामकडे लक्ष ठेवा, असे अगदी सहजपणे सर्वसामान्यांकडून बोलले जायचे. बाणखेले यांना गॅस सिलिंडर ही निशाणी मिळाली होती. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना हे दोन पक्ष भक्कम स्थितीत असताना दोन दिग्गजांच्या बाणखेले यांनी मिळविलेला विजय सर्वत्र चर्चेचा झाला.

हा विजय सर्वसामान्य माणसाचा आहे. अपक्ष उमेदवार असूनही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. भविष्यात गोरगरीब जनतेचे काम मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
- राजाराम बाणखेले,
विजयी अपक्ष उमेदवार

Web Title: History also happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.