ऐतिहासिक कात्रज तलाव होणार स्वच्छ

By Admin | Updated: March 23, 2017 04:32 IST2017-03-23T04:32:29+5:302017-03-23T04:32:29+5:30

मांगडेवाडीतील ड्रेनेजचे पाणी कात्रजच्या ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावात येत असल्याने तलावातील पाणी घाण होत होते.

The historic Katraj lake will be clean | ऐतिहासिक कात्रज तलाव होणार स्वच्छ

ऐतिहासिक कात्रज तलाव होणार स्वच्छ

कात्रज : मांगडेवाडीतील ड्रेनेजचे पाणी कात्रजच्या ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावात येत असल्याने तलावातील पाणी घाण होत होते. ग्रामपंचायत हद्दीतील घाण पाणी इतरत्र वळविण्यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येणार आहे. मांगडेवाडी ग्रामपंचायत यासाठी निधी देणार आहे. महापालिका हद्दीतील कामे महापालिकेच्या खर्चाने करण्यात येणार आहे.
मांगडेवाडी येथील अंतर्गत रस्ते व ड्रेनेजलाइनच्या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या पूजा पारघे यांच्या हस्ते झाले. या कामासाठी सुमारे २२ लाख रुपये निधी नवनाथ पारघे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे.
भूमिपूजन सोहळ्यास नगरसेवक प्रकाश कदम, मांगडेवाडीच्या उपसरपंच अंजना मांगडे, राष्ट्रवादी युवकचे हवेली तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांगडे, माजी सरपंच विलास मांगडे, भानुदास मांगडे, रामभाऊ मांगडे, उमेश मांगडे, नितीन रणशिंंग आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
निधी देण्याचे आश्वासन
४भूमिपूजन सोहळ्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मांगडेवाडीतील ड्रेनेजचे पाणी जे कात्रजच्या नानासाहेब पेशवे तलावात जाते ते रोखण्यासाठी मोठी वाहिनी टाकावी, यासाठी जिल्हा परिषद निधी, तसेच ग्रामपंचायत निधी वापरण्यात यावा, याविषयी चर्चा झाली. मांगडेवाडी ग्रामपंचायत हद्दीपर्यंत हे काम करण्यात येणार आहे.
४ग्रामपंचायत हद्द संपल्यावर महापालिका हद्द सुरू होते. तेथून पुढे ड्रेनेजचे काम महापालिकेने करावे, अशी सूचना मांडण्यात आली. कात्रज तलावात येणारे घाण पाणी इतरत्र वळविण्यासाठी निधी देऊन काम पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन नगरसेवक कदम यांनी ग्रामस्थांना दिले.

Web Title: The historic Katraj lake will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.