रोजंदारीवरील शिपाई, रखवालदारांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:22+5:302021-01-08T04:27:22+5:30

पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील १०३ शिपाई व २६७ रखवालदार यांचे दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने, शिक्षण ...

Hired soldiers, guards warn of agitation | रोजंदारीवरील शिपाई, रखवालदारांचा आंदोलनाचा इशारा

रोजंदारीवरील शिपाई, रखवालदारांचा आंदोलनाचा इशारा

पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील १०३ शिपाई व २६७ रखवालदार यांचे दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने, शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षण विभागाकडील रोजंदारी सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्व सेवकांचे वेतन लवकरात लवकर करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे महानगरपालिका कामगार युनियनने दिला आहे.

युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी सांगितले की, या सर्व सेवकांचे डिसेंबर वर्षाचा शेवट उलटून देखील नोव्हेंबर पेड इन डिसेंबरचे वेतन अद्याप झालेले नाही. याबाबत प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार करून व चर्चा करून देखील वेळेवर वेतन करण्यासाठी तिडा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. शिक्षण विभाग प्राथमिककडील एकूण २८५ शाळांमधून मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण दिले जाते.

सदर शाळेच्या इमारतीच्या देखरेखी करता रखवालदार यांचेमार्फत कामकाज चालते व शिपाई शालेय स्वच्छतेचे व टपाल पोहोचवण्याचे कामकाज अतिशय प्रामाणिकपणे करीत असतात. असे असताना वेतन वेळेवर न दिल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे वेळेवर वेतन अदा करण्यात आले नाही, तर युनियनच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भट यांनी दिला आहे.

Web Title: Hired soldiers, guards warn of agitation