हिराभाई : कोहिनूर ‘हिरा’
By Admin | Updated: September 7, 2014 00:27 IST2014-09-07T00:27:20+5:302014-09-07T00:27:20+5:30
भाईंचे नाव हिराभाई आणि व्यापार ‘कोहिनूर’ बासमती.. के केवळ योगायोग असला, तरी आज पुण्याच्या व्यापारी विश्वातील हा ‘कोहिनूर’ हिराच आहे.

हिराभाई : कोहिनूर ‘हिरा’
हिराभाई डाह्यालाल शहा ऊर्फ हिराभाई चोखावाला.. पुणो शहराच्या व्यापार, उद्योग, समाजकारण आणि स्थावरात्मक घडामोडीतील एक अत्यंत उज्ज्वल अशी यशस्वी जीवनगाथा.. भाईंचे नाव हिराभाई आणि व्यापार ‘कोहिनूर’ बासमती.. के केवळ योगायोग असला, तरी आज पुण्याच्या व्यापारी विश्वातील हा ‘कोहिनूर’ हिराच आहे. या यशस्वी जीवनगाथेला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. राजबिंडे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि कर्णाचे ‘हात’ लाभलेल्या या 81 वर्षाच्या तरुणाचा उत्साह आज ही भल्याभल्यांना चकित करून टाकतो.
हिराभाईंचा जन्म गुजराथमधील मेहसाना जिल्ह्यातील ‘ओगलोड’ या तीर्थक्षेत्रजवळील ‘पेधामली’ या छोटय़ा गावात 7 सप्टेंबर 1933 रोजी झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच हिराभाईंचा जन्म, भव्य महालासारखे घर, हत्ती, घोडे, दूध- दूभते असा सगळा श्रीमंती थाट, त्यात हिराभाई म्हणजे नवसाने झालेले. त्यामुळे त्यांची आई त्यांना फुलासारखी जपत असे. एक मोठी बहीण, वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आई आणि आजोबा, आणि मोठी बहीण, चौथीर्पयतचे शिक्षणसुद्धा गावातच; पण वय अवघे 9 वर्षे असताना हिराभाईंच्या आईचे आकस्मिक निधन झाले. आणि घराचे वासे फिरावेत इतक्या वेगाने या सर्व श्रीमंती थाटाची वाताहत झाली. सर्व संपत्ती नातेवाइकांनी हडप केली. आणि उदरनिर्वाहासाठी कोवळ्या वयात भाई पुण्याकडे चुलत्यांच्या दुकानी दाखल झाले.
तुळशीबागेजवळ ‘नीचे दुकान उप्पर मकान’ या व्यापारी संस्कृतीत त्यांचा कष्टप्रद प्रवास सुरू झाला. भल्या पहाटे तुळशीबागेतील हौदावर जाऊन तिथेच अंघोळ, आणि घरचे पाणी भरून नेणो, सकाळी सकाळी दुकानासमोरील रस्ते झाडणो, छकडे खाली करणो, धान्य निवडणो, आणि पडेल ते हमालीसह प्रत्येक काम हा भाईंच्या जीवनाचा रोजचा परिपाठ झाला. मातृ-पितृ छत्र हरपलेला हा कोवळा जीव शहरभर पायपीट करू लागला. सायकलवर वसुलीसाठी गल्लीबोळात फिरू लागला. पुण्याच्या आरसीएम या एकमेव गुजराथी माध्यमाच्या शाळेत 8 वी र्पयतचे शिक्षण भाईंनी कसेबसे पूर्ण केले.
अंभगूत व्यापारी चुणचुणीतपणामुळे वयाच्या 14व्या वर्षी मुंबईतील एका ओळखीच्या सूतगिरणी मालकाने भाईंना हेरले आणि मुंबईला 3क् रुपये मासिक पगारावर नोकरी दिली़ व्यवसायचातुर्य ओळखून पगार 3क्क् रुपये केला. मालकाने त्यांना पुत्रवत मानून व्यवसायात भागीदारी दिली आणि त्यानंतर भाईंनी कधीच मागे वळून पाहिले नाही़ बँकिंगपासून उद्योग व्यवस्थापनार्पयत प्रत्येक क्षेत्रंत अत्यंत निष्णात झाले; पण चुलत्याचा मुलगा अचानक आजारी पडल्यामुळे भाईंना परत पुण्यात आणले गेल़े
दाणोआळीतील ‘माळीच्या वाडय़ात’ आजच्या ‘जयराज आणि कंपनी’ या आस्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याला आता सात दशकांहून अधिक काळ लोटला गेला आह़े व्यवसायाबरोबर शहरातील प्रत्येक सामाजिक घडामोडींमध्ये रममाण होत असतात़ भारतात तांदळाच्या व्यापारात गेली अनेक वर्षे ‘जयराज आणि कंपनी’ अव्वल आहे. जयंत आणि राजेश या मुलांच्या नावाने जयराज उद्योगसमूहाची निर्मिती झाली. हिराभाईंनी जी उत्तुंग ‘ङोप’ घेतली, त्याचे सारे श्रेय ते आपल्या स्वर्गीय धर्मपत्नी कांचनबेन यांनाच देतात. आईनंतर माझा सांभाळ फक्त माङया पत्नीनेच केला, हे ते अभिमानाने सांगतात़ वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नीने भाईंची ‘साथ’ सोडली, पण मुले, मुली, सुना, नातवंडे असा गोकुळासारखा त्यांचा परिवार आह़े दोन्ही मुलांनी व्यवसायाचा प्रचंड व्याप वाढविला आह़े हिराभाईंनी व्यापारातून आता निवृत्ती घेतली असून, नव्या पिढीकडे ‘सूत्रे’ बहाल केली आहेत़ ‘पूना र्मचट चेंबर’ आणि कांताबेन महिला उद्योग समूहाचे संस्थापक सदस्य, आदिनाथ सोसायटी, पूना हॉस्पिटल, गुजराथी बंधू समाज, पोपटलाल शहा स्मारक ट्रस्ट, पूना ब्लाईंड मेन्स असो़, जनसेवा फौंडेशन, एच़व्ही़ देसाई आय हॉस्पिटल, महावीर जैन विद्यालय, आऱ सी़ एम़ हायस्कूल व कॉलेज, गुजराथी केळवणी मंडळ, अशा शेकडो संस्थांच्या मागे भाई भक्कमपणाने उभे आहेत. कित्येक संस्थाचे ते आधारस्तंभ आहेत़ विशेष म्हणजे त्यांची मुले जयंतभाई व राजेशभाई यांनी वडिलांच्या मुक्त दानशूरपणाचा वारसा तितक्याच सढळपणो चालविला आहे.
- युवराज शहा