शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Pune Metro: हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे रूळ बसवण्यास सुरूवात

By राजू इनामदार | Updated: November 17, 2023 15:44 IST

सुरूवातील डेपोमध्ये चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याचे काम सुरू झाले....

पुणे : हिंजवडीच्या आयटी हबची संजीवनी अशी ओळख होऊ लागलेल्या शहरातील शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाचे रूळ बसवण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली. सुरूवातील डेपोमध्ये चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याचे काम सुरू झाले.

हिंजवडीत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी हा मेट्रो मार्ग खरोखरच संजीवनी ठरणार आहे. २३ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर सध्या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करतच जावे लागते. त्याशिवाय प्रदुषण व अन्य अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वाहनांच्या संख्येमुळे दररोज वाहतूकीची कोंडी होते ती वेगळीच. हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गा या सगळ्या समस्यांवरचा उपाय ठरणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग उन्नत (इलेव्हेटेड) आहे.  त्यावर २३ स्थानके आहेत. खांब उभारणीचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून स्थानक उभारणीचे काम वेगात सुरू आहे. शुक्रवारी यात आणखी एक जास्तीचे पाऊल टाकण्यात आले व प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ('पीएमआरडीए') च्या संनियंत्रणात हे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर सुरू आहे. खासगी कंपनीने निविदेद्वारे हे काम घेतले असून कामाच्या प्रत्यक्ष नियंत्रणासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. खासगी कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडेच पुढील ३५ वर्षांसाठी या मेट्रोच्या संचलनाची जबाबदारी देण्याचा करार करण्यात आला आहे.

शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे सहयोगी एकॉम (AECOM) आणि एसजीएस (SGS) च्या सजग नजरेखाली रुळांच्या विविध प्राथमिक चाचण्या घेण्यात येत आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या २३.३ किमी मार्गासाठी रेल ट्रॅकची एकूण आवश्यकता, त्यांचे स्केलिंग, या रुळांची देखभाल अशा अनेक गोष्टींचे नियोजन सुरू आहे. सुरक्षेच्या बाबतीत काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

आलोक कपूर- मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो