शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

हिंजवडी : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात निघाली बगाड मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 19:09 IST

म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास...

हिंजवडी : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष खंड पडलेली बगाड मिरवणूक यंदा म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत मोठया उत्साहात पार पडली. यावेळी हिंजवडी, वाकडसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ऐतिहासिक बगाड मिरवणूक पहायला गर्दी केली होती. 

हिंजवडीचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने बगाड मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यंदा, शनिवार (दि.१६) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हालगी तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, खोबरे भंडाऱ्याची उधळण करत बगाड मिरवणूक सुरु झाली.

यावेळी, सहभागी ग्रामस्थांनी पैस.. पैस.. म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा एकच जयघोष करत परिसर दणानून सोडला. दरम्यान, प्रथेप्रमाणे हिंजवडी गावठाण येथील होळी पायथा मैदानात बगाडाचे मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र येतात. परंपरेनुसार गळकरी होण्याचा मान जांभूळकर वाड्यातील तरूणांना असल्याने, मान्यवरांकडून यंदा गळकरी म्हणून रामदास शिवाजी जांभुळकर निवड घोषित करण्यात आली.

साखरे यांनी गळकऱ्याला गळ टोचला, संदेश साखरे आणि दीपक साखरे यांना यंदा खांदेकरी होण्याचा मान मिळाला. सायंकाळी पाचच्या सुमारास खांदेकरऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले आणि कडाडनाऱ्या हालगीच्या आवाजात पैस पैस .. म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या एकच जयघोष करत बगाड मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड हिंजवडी गावठाण, कस्तुरी चौक, भुमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्तीमार्गे वाकड गावामध्ये दाखल झाले. बगाड मार्गावर जागोजागी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सरबत, थंडगार पाण्याची सोय कारण्यात आली होती. वाकड मधील म्हातोबाच्या मंदिरात बगाड मिरवणुकीची पारंपारिक पद्धतीने सांगता करण्यात आली. बगाड मार्गा दरम्यान ठीक ठिकाणी वाहतूक वाळवीण्यात आली होती, हिंजवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :PuneपुणेHanuman Jayantiहनुमान जयंती