आयटी अभियंत्याची हिंजवडीत आत्महत्या
By Admin | Updated: February 4, 2017 04:00 IST2017-02-04T04:00:24+5:302017-02-04T04:00:24+5:30
हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

आयटी अभियंत्याची हिंजवडीत आत्महत्या
वाकड : हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.
अभिषेककुमार राजेशकुमार यादव (वय २३, रा. बी/१३०२ मेगा पॉलिस माण, मूळ. बिहार) असे त्या अभियंता तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रघुनाथ उंडे यांनी दिलेली माहिती अशी अभिषेक हा दुपारच्या शिफ्टमध्ये कंपनीत जाणार असल्याने घरीच होता. दरम्यान, त्याने बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही रूममेट मित्र सदनिकेची बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद भेटत नसल्याने त्यांना शंका आली याबाबत त्यांनी पोलिसांना कळविल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)