शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 19:22 IST

स्वतःसाठी अथवा राजकारण किंवा कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही, हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे

इंदापूर: वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत या मागणीसाठी आ. राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणेंनी आपल्या येण्याला व सभेला विरोध करणाऱ्यांवर खरपूस टीका केली आहे. मुसलमान हिंदूंचे शत्रु नाहीत, हिंदूच हिंदूंचे शत्रु आहेत म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही नितेश राणेला नव्हे तर भगव्याला विरोध करता आहात असे ते म्हणाले आहेत. 

श्रीराम वेस नाक्यावरील विठ्ठलाच्या मुर्तीपासून नितेश राणे,संग्राम भंडारे पाटील,माऊलीच चवरे,भारत जामदार,किरण गानबोटे,राहुल गुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहराच्या मुख्य रस्त्याने नगरपरिषदेच्या मैदानावर आल्यानंतर, छ.शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सभेस सुरुवात झाली.

 राणे म्हणाले की,ज्या शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या घराण्याच्या आद्यपुरुषाच्या गढीवर जर अतिक्रमण होत असेल, त्यांचा अवमान होत असेल. तर अशा गोष्टींना विरोध करणार नसू तर आम्हाला महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न मनात घेवून आपण येथे आलो आहोत. कोणत्या पक्षाचा आमदार वा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. स्वतःसाठी अथवा राजकारण करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे. इंदापूरात येवून वातावरण खराब करण्याचा,कायदा सुव्यवस्था बिघडवायची असा ही विषय नाही. आपल्या येण्याला व सभेला विरोध करणारायांवर त्यांनी खरपूस टीका केली. मुसलमान हिंदूंचे शत्रु नाहीत, हिंदूच हिंदूंचे शत्रु आहेत म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही नितेश राणेला नव्हे तर भगव्याला विरोध करता आहात असे ते म्हणाले. मी काही व्हाईट कॉलर आमदार नाही. जेथे जातो तेथे तयारीनेच जातो.दोन चार जणांना झोपवूनच घरी जायचे त्यांचातला मी आहे. बरे झाले पोलीस आमच्या गाड्या तपासत नाहीत. विरोध करणाऱ्यांच्या डोक्यावर जेवढे केस नसतील ३०७,३५३ च्या केसेस माझ्यावर आहेत असे ते म्हणाले.

मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत काढून टाकण्यात आली नाहीत तर तुम्ही फार काळ खुर्चीवर रहाणार नाहीत, असा सज्जड इशारा राणे यांनी यावेळी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेNitesh Raneनीतेश राणे HinduहिंदूMuslimमुस्लीमMorchaमोर्चाPoliticsराजकारणIndapurइंदापूर