विदेशी युगुलांनाही हिंदू विवाह पद्धतीची भुरळ
By Admin | Updated: November 14, 2016 02:10 IST2016-11-14T02:10:56+5:302016-11-14T02:10:56+5:30
हिंदू पद्धतीनुसार विवाह करण्याची भुरळ सातासमुद्रापार असलेल्या फॉरेनर नागरिकांनाही पडत असून, आळंदी येथे रविवारी एका प्रेमी युगुल जोडप्याचा विवाह हिंदू धार्मिक विधीनुसार पार पडला.

विदेशी युगुलांनाही हिंदू विवाह पद्धतीची भुरळ
आळंदी : हिंदू पद्धतीनुसार विवाह करण्याची भुरळ सातासमुद्रापार असलेल्या फॉरेनर नागरिकांनाही पडत असून, आळंदी येथे रविवारी एका प्रेमी युगुल जोडप्याचा विवाह हिंदू धार्मिक विधीनुसार पार पडला.
साखरपुडा, हळदी समारंभ, विवाह, अग्निदेवतेला साक्षी ठेवून सात फेरे, कन्यादान या विधींनी हे जोडपे हरखून गेले. विवाह झाल्यानंतरही कित्येक तास एकमेकांच्या
गळ्यातील हार, मराठी संस्कृतीचा मराठमोळा पेहराव जोडपे तसाच परिधान करून होते. कन्यादानाला मागे मामा उभे करण्यापासून मुलीची खणानारळाने ओटी भरण्यापर्यंत सर्व रूढी या विवाहात पार पडल्या. विवाहानंतर आईवडिलांचे घर सोडून सासरी जाणाऱ्या मुलीच्या भावना फॉरेनरच्या डोळ्यांतही अगदी स्पष्ट दिसत होत्या.
टंगी बर्गेस व स्टीफनी असे या जोडप्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भारतात वास्तव्यास आहे. चाकण एमआयडीसीमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत दोघेही वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी गणपती बाप्पावर श्रद्धाही ठेवली. नित्याची गणेशपूजा ही त्यांची दिवसाची सुरुवात.
यातूनच येथील विवाह पद्धतीनुसार लग्न करावे, असे दोघांनाही ठरवले. तुलसी विवाहानंतरचा मुहूर्त ठरवत हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकवले. विवाहानंतर काही तासांतच हे जोडपे घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याकरिता विदेशी रवाना झाले. (वार्ताहर)