शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार

By राजू हिंगे | Updated: June 21, 2024 20:53 IST

स्थायी समितीची ६ कोटी ५६ लाखाच्या निविदेला मंजुरी

पुणे : चांदणी चौक येथील बावधन खुर्द सर्वे नंबर १९ आणि २० येथे  हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्यात येणार आहे. येथे १७ फुट उ उंचीच्या चौथ्यावर तब्ब्ल २० फूट उंचीचा ब्रांझ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा  पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रूपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. 

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, भवन विभागाचे युवराज देशमुख  यांनी ही माहिती दिली. चांदणी चौकाकडून वारजे कडे जाणारा रस्ता आणि मुळशीकडून कोथरूड कडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मध्ये  ५ हजार ५४२ चौरस मीटर जागा उपलब्ध  आहे. या जागेत  हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्यात  येणार आहे.  या कामासाठी पालिकेने आर्किटेक्ट सतीश कांबळे यांची नेमणूक केली आहे. या प्रकल्पामध्ये स्टोन क्लाउडिंग असलेले प्रवेशद्वार  उभारण्यात येणार आहे.  कमळाच्या पाकळ्याच्या आकारातील कारंजे त्यामधील अंदाजे १७ फुट उंचीच्या चौथ्यावर २० फूट उंचीचा ब्रांझ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पिवळ्या व लाल रंगाच्या स्टोन मधील पदपथ , जागेच्या दुसऱ्या बाजूला छोटे प्रवेशद्वार,  मिळकतीच्या एका बाजुला आरसीसी रिटेनिंग वॉल ,इतर बाजूस सीमा भिंत  उभारली जाणार आहे. उर्वरित जागेत उद्यान विषयक कामे करण्यात येणार आहे .या कामासाठी पालिकेच्या बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या कामासाठी कोणी महापालिकेने निविदा मागवली होती. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रूपयांची निविदा आली होती. या या निवेदला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhighwayमहामार्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMONEYपैसा