अपहरणकर्त्यांना अटक

By Admin | Updated: September 8, 2014 04:13 IST2014-09-08T04:13:49+5:302014-09-08T04:13:49+5:30

येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली.

Hijackers arrested | अपहरणकर्त्यांना अटक

अपहरणकर्त्यांना अटक

पाटस : वरवंड (ता. दौंड) येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली.
कुरकुंभ येथील युवक राहुल भोसले, वरवंड येथील युवक दीपक दिवेकर यांच्या सर्तकतेमुळे अपहरण केलेल्या बालकाला जीवदान मिळाले; अन्यथा आरोपींनी या बालकाचे बरेवाईट केले असते.
याप्रकरणी लखन विलास देशमुख (रा. कुरकुंभ, ता. दौंड), अविनाश संजय शिंदे (रा. यवत, ता. दौंड), अक्षय संजय राऊत (रा. सोलापूर) या तिघांना अटक करण्यात आली.
शनिवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास वरवंड गावच्या परिसरातून सूरज कदम हा बालक सायकलवरून येत असताना वरील तिन्ही आरोपींनी त्यांच्या जवळील ट्रक थांबविला आणि सूरजला म्हणाले, ‘तू आमची माहिती पोलिसांना पुरवतो,’ असे सांगून त्याला बेदम मारहाण करून त्याला चाकूचा धाक दाखवून ट्रक मध्ये (क्र. एमएच १२, एक्यू ६२२0) मध्ये टाकले आणि त्याचे अपहरण केले. ज्या वेळेस या बालकाला आरोपी मारत होते. त्या वेळेस काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यानुसार ग्रामस्थांनी त्याच्या घरी सदरची घटना कळवली.
कुटुंबातील मंडळींनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सोलापूरपर्यंत नाकेबंदी केली.
तसेच पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, फौजदार किनगी, फौजदार सुभाष कांबळे, पोलीस हवलदार रूपेश नावडकर यांनी पोलीस व्हॅनमधून आरोपींचा शोध
घ्यायला सुरुवात केली असता, रात्री आरोपींना ट्रकसह कुरकुंभ येथील आनंद गार्डन ढाब्याच्या परिसरात ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने अटक करून अपहरण केलेल्या बालकाला सुखरूप त्याच्या घरी पोहोच केले. (वार्ताहर)

Web Title: Hijackers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.