गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण

By Admin | Updated: December 3, 2014 02:56 IST2014-12-03T02:56:42+5:302014-12-03T02:56:42+5:30

माटोबा तलाव (ता. दौंड) परिसरात तवेरा गाडीच्या चालकाला शस्त्राने मारहाण करुन गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.

A hijack of a passenger with a car | गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण

गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण

दौंड : माटोबा तलाव (ता. दौंड) परिसरात तवेरा गाडीच्या चालकाला शस्त्राने मारहाण करुन गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.
या प्रकरणी जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार (दि. १) रोजी सकाळी १0 वाजता दौंड रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या तवेरा गाडीजवळ (क्र. एम.एच. १२ सी.आर. ५४५३) चार प्रवाशी आले. यावेळी गाडीचा चालक प्रमोद सिपनकर (रा. दौंड) याला चारीही प्रवाशी म्हणाले , खुटबाव (ता. दौंड) येथील पोल्ट्री फार्मवर जायचे आहे.
त्यांच्यात चर्चा होऊन गाडीचे भाडे ठरले. त्यानुसार हे चौघे गाडीत बसले . दरम्यान यवतकडे जाण्यासाठी अन्य एक दुसरा प्रवाशी बसला. गाडी लडकतवाडी मार्गे खुटबावला निघाली. त्यानंतर गाडी माटोबा तलावाच्या दिशेने गेली. यावेळी गाडी थांबविण्यात आली. थोड्यावेळाने गाडी सुरु झाली तेव्हा चालक प्रमोद याला चाकूचा धाक दाखवून मागच्या सिटावर ओढून त्याला सिटाखाली टाकले. त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. चाकूचा धाक दाखवुन त्याचे हात पाय बांधून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला गाडीतून खाली उतरुन दिले. तसेच गाडीत बसलेल्या अन्य एका प्रवाशासह तवेरा गाडीचे अपहरण करुन या चोरट्यांनी पोबारा केला.
त्यानंतर प्रमोदने कसेबसे हाता पायाला आणि तोंडाला बांधलेले कापड बाजूला करून एका वस्तीजवळ जाऊन मदत मागीतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला प्रमोदने घडलेली घटना सांगून यवत पोलीस स्टेशन पर्यंत सोडून देण्याची विनंती केली. दुचाकीस्वाराने प्रमोदला पोलीस स्टेशनाला नेल्यानंतर चौकशी करुन हा गुन्हा दौंड पोलीसांकडे वर्ग केला. (वार्ताहर)

Web Title: A hijack of a passenger with a car