हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय पुण्यात उघड
By Admin | Updated: November 14, 2014 02:04 IST2014-11-14T02:04:29+5:302014-11-14T02:04:29+5:30
येरवडय़ातील शास्त्रीनगर भागात चालणारा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक तर, चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय पुण्यात उघड
पुणो : येरवडय़ातील शास्त्रीनगर भागात चालणारा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक तर, चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या तरुणींमध्ये उझबेकिस्तानच्या एकीचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी दिली आहे.
भुपेन छत्री (33), नूरबहादूर कोईराला (35) आणि रवी कृष्णा चौधरी (26) अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेही आसामचे रहिवासी आहेत. शास्त्रीनगर येथील हर्म्स हेरीटेज सोसायटीमधील एका सदनिकेत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये कोलकात्याच्या दोन, ठाण्याची एक आणि उझबेकीस्तानच्या एक अशा चार तरुणींचा समावेश आहे