शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 13:05 IST

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर,  सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले.

ठळक मुद्देशिक्षक,  पदवीधरचा अंतिम निकाल लागण्यासाठी शुक्रवारची सायंकाळ उजाडणार मतमोजणीसाठी 1200 कर्मचारी व 700 पोलिसांचा बंदोबस्त  गुरूवारी सकाळी पुण्यातील बालेवाडी होणार मतमोजणीमतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज टक्केवारी वाढल्याने प्रशासनासमोर मतमोजणीचे आवाहन 

पुणे : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व जिल्ह्यातील मतदान पेट्या पुण्यातील बालेवाडी गुरूवारी पहाटेपर्यंत पोहचतील. त्यानंतर बुधवार (दि.३) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु यावेळी  उमेदवारांची प्रचंड संख्या,त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळपर्यंत जाहीर होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पुणे विभागात पदवीधरसाठी ५७. ९६ तर शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान झाले आहे. 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर,  सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल १२०० कर्मचारी आणि ७०० पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात पदवीधर मतदार संघासाठी ११२ टेबल व शिक्षकसाठी ४२ टेबल लावण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. दरम्यान मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्याचे राव यांनी सांगितले. --------अशी होते मतमोजणी पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जिल्ह्याच्या मतपत्रिका एकत्र करणार. मतपत्रिकांची मोजणी करून स्वतंत्र ट्रेमध्ये ठेवणा. त्यानंतर वैध व अवैध म्हणजे बाद झालेले मतपत्रीका वेगळ्या काढण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण वैध मतपत्रीका निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यासाठीचा मतदानाचा कोट निश्चित केला जाईल. यात एकूण वैध मतदान व एकूण उमेदवारांवर हा कोटा निश्चित होईल. ( उदा: एकूण वैध मतदान 800 असेल तर भागिले 2 + निवडून द्यावयाची संख्या 1 : पहिल्या पसंती क्रमांकत निवडून येण्याचा मतांचा कोटा 401) असे निश्चित केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. यात पहिल्या पसंती फेरीत एकाद्या उमेदवाराला निश्चित केलेल्या कोट्या ऐवढे मतदन झाल्यास संबंधित उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजावी लागतील. असे झाल्यास मतमोजणीची प्रक्रिया लांबू शकते.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानResult Dayपरिणाम दिवस