सर्वाधिक चुरस 104 मतदारसंघात

By Admin | Updated: September 29, 2014 23:57 IST2014-09-29T23:57:17+5:302014-09-29T23:57:17+5:30

कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी शिवसेना- भारतीय जनता पक्ष युती एकत्र लढत असूनही राज्यातील तब्बल 1क्4 मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व आत्तार्पयत राहिलेले नाही.

The highest number of 104 constituencies | सर्वाधिक चुरस 104 मतदारसंघात

सर्वाधिक चुरस 104 मतदारसंघात

>विवेक भुसे - पुणो
कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी शिवसेना- भारतीय जनता पक्ष युती एकत्र लढत असूनही राज्यातील तब्बल 1क्4 मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व आत्तार्पयत राहिलेले नाही. गेल्या वेळी तर या मतदारसंघात विजयातील अंतर 1क् हजारांपेक्षा कमी होते. आघाडी आणि युतीतील बेबनावामुळे चारही पक्ष वेगवेगळे लढत असल्याने येथील चुरस अधिकच वाढणार आहे. 
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीने विदर्भ दिग्विजय  केला. मात्र, 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील 24 मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या होत्या.  पश्चिम महाराष्ट्रात आघाडीचे वर्चस्व मानले जात असलेल तरी येथेही  19 ठिकाणचे उमेदवार अत्यंत कमी मताने निवडून आले होते.  गेल्या विधानसभेच्या तुलनेत यंदा प्रत्येक मतदारसंघात जवळपास 3क् हजार मतदारांची वाढ झाली आहे. शिवाय बहुतेक ठिकाणी चौरंगी- पंचरंगी सामने रंगणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या दृष्टीने या जागा अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत.  
विदर्भातील चुरशीच्या 24 मतदारसंघात सर्वाधिक 12 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आह़े त्याखालोखाल भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि शिवसेनेच्या 3 उमेदवारांच्या विजयाची मते 1क् हजारांपेक्षा कमी आहेत़ त्यामुळे या मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढतीत अतिशय चुरस पहायला मिळू शकत़े पश्चिम महाराष्ट्रात अशा 22 जागा असून त्यात सर्वाधिक 6 ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजय झाले. त्याखालोखाल 5 ठिकाणी काँग्रेस आणि 4 ठिकाणी राष्ट्रवादी व भाजप उमेदवार आहेत़ त्याचबरोबर अपक्ष म्हणून विजयी झालेले 3 उमेदवार आहेत़ यामध्ये कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बंडखोरांनी खाल्लेल्या मतांमुळे मोठा परिणाम झाला होता. या विभागातील काठावर विजयी झालेल्या आमदारांनी या निवडणुकीत पक्ष बदलला आह़े  काही बंडखोरांनी आता रितसर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आह़े त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील हे 22 मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहणार आहेत़ 
मराठवाडा विभागातील 17 जागांवरील विजयाचे अंतर 1क् हजारांपेक्षा कमी होत़े त्यात काँग्रेस 7, शिवसेना 4, राष्ट्रवादी 3 आणि अपक्ष व इतर 3 यांचा समावेश आह़े मुंबईतील 12 जागांमध्ये सर्वाधिक 7 ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांचे मताधिक्य काठावरचे आह़े त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी 2 आणि शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आह़े मुंबईमध्ये तब्बल 25 वर्षानंतर वेगवेगळे लढत असलेल्या शिवसेना आणि भाजपची ताकद विभागली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील हे मतदारसंघ कोणाला साथ देतात, हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. 
 कोकणात चुरशीच्या लढती झालेले 14 मतदारसंघ आहेत. त्यात भाजपच्या 5 आमदारांचा समावेश आह़े त्यांना गेल्या वेळी शिवसेनेची मदत होती. आता ही मिळणार नाही, त्यामुळे या जागांवरचे निकाल बदलू शकतात. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 3 आणि मनसेच्या एक आमदार आह़े शेकाप व इतरांचे 2 ठिकाणी अतिशय चुरस दिसून येण्याची शक्यता आह़े 
उत्तर महाराष्ट्रात 15 जागांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 4 आमदारांचे मताधिक्य 1क् हजारांपेक्षा कमी आहे.  भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 3 आमदारांचा समावेश आह़े 
 
2क्क्9 मधील विधानसभा निवडणुकीत 
1क् हजारांपेक्षा कमी मताधिक्य असलेले मतदारसंघ
विभागकाँग्रेसराष्ट्रवादीशिवसेनाभाजपमनसेइतरएकूण
पश्चिम महाराष्ट्र5464क्322
विदर्भ12435क्क्24
मराठवाडा734क्317
मुंबई721क्2क्12
कोकणक्3351214
उत्तर महाराष्ट्र3443क्115
एकूण342क्2117391क्4

Web Title: The highest number of 104 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.