शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
3
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
4
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
5
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
6
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
7
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
8
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
9
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
10
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
11
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
12
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
13
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
14
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
15
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
16
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
17
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
18
तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा
19
अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?
20
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:59 IST

उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.

इंदापूर  - उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून नेहमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्येही संघर्ष होताना लोकांनी पाहिले आहे. उन्हाळ्यात तर धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने होतात. तथापि या उन्हाळ्यात असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता धूसर आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पावसाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी साठवण क्षमतेपेक्षा जास्त १२१ टीएमसी पाणी उजनी धरणाकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवत, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.गेल्या खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान उजनी धरणातून कालवा व भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. बोगद्याद्वारे, तळे, तलाव, बंधारे भरून घेण्यात आले. पाणी मोठ्या प्रमाणात साठले. परिणामी धरणाच्या पाण्याची मागणी कमी झाली. दोन महिने पाणी सोडावे लागले नाही. त्याचा फायदा होऊन उजनी धरणाचा पाणीसाठा उच्चांकी राहिला आहे.उजनीचा सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा हा दि. ४ जुलै २०१६ रोजी नोंदवला गेला होता. त्या वेळी धरणात वजा ५३.४३ टक्के पाणी होते. एकूण पाणीसाठा हा केवळ ३५.३५ टीएमसी होता.उजनीचा पाणीसाठाउजनी धरणातील आजची पाणी परिस्थिती अशी आहे एकूण पाणीसाठा८६. ८५टीएमसी.४३. २९टक्केवारी

टॅग्स :DamधरणPuneपुणे