हायमास्ट दिव्यांनी केडगाव निघाले उजळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST2021-06-11T04:08:13+5:302021-06-11T04:08:13+5:30

केडगावमधील स्टेशन, गावठाण, देशमुख मळा, हंडाळवाडी, सोडनवरवस्ती, धुमळीचा मळा आदी ६ प्रभागांमध्ये मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणे या दिव्यांमुळे ...

High mast lights lit up Kedgaon | हायमास्ट दिव्यांनी केडगाव निघाले उजळून

हायमास्ट दिव्यांनी केडगाव निघाले उजळून

केडगावमधील स्टेशन, गावठाण, देशमुख मळा, हंडाळवाडी, सोडनवरवस्ती, धुमळीचा मळा आदी ६ प्रभागांमध्ये मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणे या दिव्यांमुळे अक्षरशः उजळून निघाले आहेत. यासाठी ग्रामपंचायत मुद्रांकशुल्क, १४ वा वित्त आयोग, दलितवस्ती सुधारणा योजना निधी खर्च करण्यात आल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी सुभाष डोळस यांनी दिली. या वेळी सरपंच अजित शेलार पाटील व उपसरपंच अशोक हंडाळ म्हणाले की, लवकरच ग्रामपंचायतीने निधीतून १४ लाख ६७ हजार रुपये खर्चून रुग्णवाहिका खरेदी करत आहोत. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हायमास्ट दिवे लावल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

१० केडगाव

केडगाव येथे हायमास्ट दिव्यांमुळे रात्रीचा उजेड पडत आहे.

Web Title: High mast lights lit up Kedgaon