‘तिचा’ खून करून ‘त्याची’ आत्महत्या
By Admin | Updated: May 8, 2017 03:01 IST2017-05-08T03:01:44+5:302017-05-08T03:01:44+5:30
आदर्शनगर, दिघीमधील सपना सुरेश भले या विवाहितेच्या घरात शिरून दरवाजा बंद करून ओम ऊर्फ पद्माकर साबळे

‘तिचा’ खून करून ‘त्याची’ आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आदर्शनगर, दिघीमधील सपना सुरेश भले या विवाहितेच्या घरात शिरून दरवाजा बंद करून ओम ऊर्फ पद्माकर साबळे (वय २४, मूळ गाव हडसर, ता. जुन्नर) या तरुणाने तिचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:च्या हाताच्या शिरा कापून आत्महत्या केली. हे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. विवाहितेचा भाऊ संदीप जोशी याने फिर्याद दिली आहे.
आदर्शनगर, दिघी येथे दोन वर्षांपासून सपना पतीसोबत राहत होत्या. त्यांना एक मुलगी आहे. भोसरी एमआयडीसीत तिचा पती कंत्राटी पद्धतीने कंपनीत काम करतो. नेहमीप्रमाणे पती कामावर गेलेला असताना, ती घरी एकटीच होती. त्या वेळी तिच्याशी तोंडओळख असलेला त्यांच्या गावाकडील पद्माकर साबळे हा तरुण तिच्या घरी आला. घरातून मुलीला बाहेर जाण्यास सांगितले. त्याने सपनावर सुरीने वार केले. त्यानंतर स्वत:च्या हाताच्या शिरा कापल्या. सपनाचा खून केल्यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी फिर्याद पोलिसांकडे दाखल झाली आहे.