पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

By Admin | Updated: April 27, 2017 05:11 IST2017-04-27T05:11:24+5:302017-04-27T05:11:24+5:30

मुलगा होत नसल्याच्या कारणास्तव पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.

Her husband arrested for suicidal behavior | पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

पुणे : मुलगा होत नसल्याच्या कारणास्तव पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. कोथरूड मधील गोसावी वस्तीत ही घटना घडली.
जया नरसिम्हा आरपल्ली ( वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती नरसिम्हा यल्लया आरपल्ली ( वय ३५ रा. गोसावी वस्ती कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेची आई यादम्मा मैलारम (वय ४८ रा. राजीव गांधी नगर खडकी) यांनी फिर्याद दिली असून, अलंकार पोलीस ठाण्यामध्ये पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया आरपल्ली हिचे आरोपीबरोबर मार्च २००८ मध्ये लग्न झाले. तिला मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिला रोज शिवीगाळ आणि मारहाण करायचा, टोचून बोलायचा, नऊ वर्षांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ तो करायचा. या छळाला कंटाळून जया हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर भादंविक ४९८ (अ), ३०६, ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Her husband arrested for suicidal behavior