शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अमॅनोरा प्रशासनाला पोलिसांनी पाठवली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:34 IST

अमॅनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र तरीही काही हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीडब्रेकरला धारदार लोखंडी आरे असलेली पट्टी अर्थात टायर किलर लावले होते.

ठळक मुद्देउलट दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी लावले होते टायर किलर पोलिसांची परवानगी न घेतल्याने हडपसर ट्राफिक पोलिसांनी पाठवली नोटीस

पुणे : अमॅनोरा पार्क सिटीतील  लोकांनी व्हाट्स ऍपच्या माध्यमातून तक्रारी केल्यामुळे अमॅनोरा पार्क सिटीत लावण्यात आलेले 'टायर किलर' काढण्याची नोटीस दिली असल्याचे हडपसर वाहतूक पोलिसांच्यामार्फत सांगण्यात आले आहे. अमॅनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र तरीही काही  हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत  नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीडब्रेकरला धारदार लोखंडी आरे असलेली पट्टी अर्थात टायर किलर लावले होते. त्यामुळे योग्य दिशेने येणाऱ्या गाड्या सुरळीत येऊ शकल्या तरी उलट दिशेने जाणाऱ्या गाड्या मात्र तात्काळ पंक्चर व्हायला लागल्या होत्या . या उपायामुळे बेशिस्त वाहनचालक जागेवर आले असून विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याचे प्रमाणही कमी झाले होते.

   मात्र आता त्यावर हडपसर पोलिसांनी आक्षेप घेतला असून अमॅनोरा प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. हे टायर किलर बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने तातडीने हे टायर किलर हटवावेत असेही यात नमूद केले आहे. त्याबाबदल हडपसर ट्राफिक पोलीस निरीक्षकांनी अमॅनोरा पार्क सिटीत  लोकांनी व्हाट्स ऍपच्या माध्यमातून तक्रारी केल्यामुळे नोटीस पाठवल्याचे कारण दिले आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक कळसकर यांनी हा रस्ता खासगी नसून असा बदल करायचा असल्यास परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर या ठिकाणी असलेल्या किलरमध्ये अडकून एखादी गाडी पडल्यास झालेल्या अपघातात प्राणही जाऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे  ऍमेनोरा प्रशासनाला नोटीस पाठवल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस