शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना क्लीनचिट देण्यासाठीच लाचलुचपत खात्याचा अहवाल : हेमंत गवंडेंचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:57 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अर्थातच खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून पक्षातील त्यांचे स्थानही बळकट झाले आहे.

ठळक मुद्दे एकनाथ खडसेंचा अहवाल क्लीनचिटसाठीच : लाचलुचपत खात्यावर गंभीर आरोप तक्रारदार हेमंत गवंडे यांनी उपस्थित केले प्रश्न 

पुणे :   माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी  प्रकरणात मुक्त करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहवाल तयार केला असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार हेमंत गवंडे यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून, भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.यावर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली होती. पुढे याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर  पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना क्लीन चिट दिली होती.जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  न्यायालयात सादर केला होता.  भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अर्थातच खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून पक्षातील त्यांचे स्थानही बळकट झाले आहे. मात्र या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या गवंडे यांनी पुन्हा आरोप केल्यामुळे नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. 

यावेळी गवंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केले. हा भूखंड चांगल्या किंमतीत विकला जाणार नाही असे एमआयडीसीचे म्हणणे असेल तर तो खडसे कुटुंबियांनी कशासाठी घेतला याकडे लाचलुचपत खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे गवंडे यांनी नमूद केले. सदर जमीन मूळ मालकांना मिळावी म्हणून खडसे यांनी बैठका घेतल्या असतानाच तीच जमीन स्वतःच्या कुटुंबीयांकरिता घेणे म्हणजे निव्वळ मोबदला मिळवण्याचा हेतू असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात व निष्कर्षात जमीन खरेदीचा हेतू, त्यासाठीची खडसेंची पूर्वतयारी, पदाचा केलेला गैरवापर या व अनेक अशा अनेक गोष्टींकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणातून खडसेंना मुक्त करणे इतकाच हेतून ठेवत अहवाल तयार केला आहे अशा शब्दात गवंडे यांनी टीका केली. त्यांच्या या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेEknath Khadaseएकनाथ खडसेMIDCएमआयडीसीBJPभाजपाbhosariभोसरी