कोडीत खुर्दच्या सरपंचपदी हेमलता जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:08+5:302021-02-21T04:20:08+5:30
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कस्तुरा खैरे, विशाल कांबळे, योगेश तळेकर, बेबी खैरे उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच निवडीनंतर आमदार संजय ...

कोडीत खुर्दच्या सरपंचपदी हेमलता जाधव
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कस्तुरा खैरे, विशाल कांबळे, योगेश तळेकर, बेबी खैरे उपस्थित होते.
सरपंच व उपसरपंच निवडीनंतर आमदार संजय जगताप व पुरंदर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता कोलते यांनी कोडीत खुर्द गावी जाऊन त्यांचा सत्कार केला.
निवडप्रसंगी काँग्रेसचे नेते शेखर बडदे, नीरा बाजार समिती उपसभापती बापुसाहेब अवचरे, माजी सरपंच सूरज अवचरे, दिलीप खैरे, अशोक खैरे, प्रदीप खैरे, दत्तात्रय खैरे, हेमंत खैरे, प्रताप खैरे, नितीन खैरे, अक्षय रणदिवे, हनुमंत अवचरे आदीसह कोडीतकर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोडीत खुर्द गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करुन सर्व कामे जलदगतीने करणार असल्याचे हेमलता जाधव व छाया खैरे यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : २० गराडे कोडीत खुर्द
फोटो ओळी : कोडीत ( ता.पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हेमलता जाधव व उपसरपंचपदी छाया खैरे यांची निवड झाल्यानंतर सत्कारप्रसंगी आमदार संजय जगताप व सुनीता कोलते