हेल्पलाइनवर करावी लागते दीर्घ प्रतीक्षाच

By Admin | Updated: October 7, 2016 03:23 IST2016-10-07T03:23:29+5:302016-10-07T03:23:29+5:30

निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी दिलेल्या 1800-22-1950 हा हेल्पलाइन क्रमांक डायल केल्यानंतर दीर्घकाळ आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे

Helpline is a long wait | हेल्पलाइनवर करावी लागते दीर्घ प्रतीक्षाच

हेल्पलाइनवर करावी लागते दीर्घ प्रतीक्षाच

पुणे : निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी दिलेल्या 1800-22-1950 हा हेल्पलाइन क्रमांक डायल केल्यानंतर दीर्घकाळ आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया प्रतीक्षा करा, असे ध्वनिमुद्रित संभाषणच दीर्घकाळ ऐकविले जाते. संपर्क होत नसल्याने इच्छुक अखेर कंटाळून फोन ठेवून देत आहेत.
आपले नाव विधानसभा मतदार यादीत आहे का?अशी जाहिरात झळकू लागल्यानंतर नव्याने नाव नोंदविण्यासाठी अनेक नागरिकांनी 1800-22-1950 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क केला. मात्र, अडीच मिनिटांपासून पाच मिनिटांपर्यंत आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया प्रतीक्षा करा, एवढाच रेकॉर्डेड प्रतिसाद मिळत आहे.
दिवसभरातून अनेकदा असा अनुभव आल्याची तक्रारवजा माहिती एका नागरिकाने ‘लोकमत’ला सांगितली.सकाळी दहा ते सायंकाळी सहादरम्यान या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दीर्घकाळ नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत असल्याने ते त्रस्त झाले.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांमध्ये उत्सुकता आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी आगामी निवडणुकांसाठी वापरली जाणार असून,१४ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदविण्याची मुदत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Helpline is a long wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.