वाचनालयांना मोफत पुस्तके दिल्याने वाचकांना मदत : उषा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:02 IST2021-07-13T04:02:13+5:302021-07-13T04:02:13+5:30
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात सुगावा प्रकाशनचे संस्थापक प्राध्यापक विलास वाघ यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक ...

वाचनालयांना मोफत पुस्तके दिल्याने वाचकांना मदत : उषा वाघ
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात सुगावा प्रकाशनचे संस्थापक प्राध्यापक विलास वाघ यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वाचनालयांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उषा वाघ बोलत होत्या. या वेळी संस्थेचे संचालक सुनील कामत, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ पुणे विभाग कार्याध्यक्ष पी. बी. जगताप, सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कर्हेकर, जयहिंद वाचनालयाच्या व्यवस्थापिका शोभा हिंगणे, समता विद्यार्थी वसतिगृह अधीक्षक शंकर मुनोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिरूर दौंड तालुक्यातील १६ सार्वजनिक वाचनालय व तीन माध्यमिक शाळांना १ लाख ९ हजार ३४५ रुपये किमतीची एकूण अकराशे पुस्तके मोफत देण्यात आली. आभार विजय भोर यांनी मानले.
तळेगाव ढमढेरे येथे सार्वजनिक वाचनालयांना मोफत पुस्तक वाटप करताना उषा वाघ व इतर मान्यवर.