कोविड सेंटरला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST2021-05-24T04:09:37+5:302021-05-24T04:09:37+5:30
शिरूर शहरांतील सराफ धरमचंद ज्वेलर्सचे मालक धरमचंद फुलफगर, त्यांचे सुपुत्र महेंद्र, देवेंद्र यांनी मातोश्री स्व. कमलाबाई भवरीलालजी फुलफगर ...

कोविड सेंटरला मदतीचा हात
शिरूर शहरांतील सराफ धरमचंद ज्वेलर्सचे मालक धरमचंद फुलफगर, त्यांचे सुपुत्र महेंद्र, देवेंद्र यांनी मातोश्री स्व. कमलाबाई भवरीलालजी फुलफगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कोविड सेंटरला १ लाख ६१ हजार रुपयांची भरीव मदत केली आहे. भाळवणी येथील कोविड सेंटरला ५१ हजार रुपये, रावलक्ष्मी ट्रस्टला ५० हजार रुपये, निघोज येथील फाउंडेशन व निघोज कोविड सेंटरला २५ हजार रुपये देणगी देत फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या सेवाभावी कार्याला पाठबळ दिले आहे. देवदैठण येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आरोग्य मंदीर कोविड सेंटरला ११ हजार रुपये, निर्वी येथील १५ कुटुंबांना एक महिन्याचा किराणा, मुलींच्या वसतिगृहात असणाऱ्या कोरोनाबाधीत मुलींना स्नहभोजन अशा प्रकारे फुलफगर कुटुंबाने १ लाख ६१ हजारांचे मदत केली आहे.