जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी वृद्धांचे हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:25+5:302021-01-08T04:28:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून ...

Helping the elderly to prove they are alive | जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी वृद्धांचे हेलपाटे

जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी वृद्धांचे हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणार अनुदान पुढे चालू ठेवण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना हयात असल्याचा दाखल द्यावा लागणार आहे. गावातील तलाठी अथवा पोलीस पाटील यांच्याकडून हा दाखला घेऊन आपल्या बँकेत सादर करावा लागतो. हा दाखल मिळवणे आणि पुन्हा बँकेत देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधारांना दरवर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान आपण हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीला शासनाकडून देण्यात येणारे अनुदान बँक खात्यावर जमा केले जाते. बोगस लाभार्थी रोखण्यासाठीच शासनाकडून हयातीचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक केले आहे. परंतु यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना खूप धावपळ करावी लागते. बँकेकडून अनेकदा दाखल, अर्ज भरण्यासाठी याच नमुन्यात अर्ज दाखल करा, हा दाखला चालणार नाही, अशी अडवणूक केली जाते. यामुळे हयातीचा दाखला मिळवणे आणि तो बँकेत सादर करणे यासाठी निराधार लोकांना चांगलीच धावपळ करावी लागते.

---------

जिल्ह्यात या योजनाचे हे आहेत लाभार्थी

- संजय गांधी निराधार योजना : 42 हजार 194

- श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना : 31 हजार 638

- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना : 10 हजार 360

- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना : 127

- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना : 769

---------

दरवर्षीच दाखल सादर करण्याची कटकट

शासनाकडून अनुदान देण्यासाठी दर वर्षीच हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिला नाही तर अनुदान बंद केले जाते. पण दाखला मिळवणे आणि तो बँकेत सादर करणे मोठे दिव्यच पार पाडावे लागते.

- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा लाभार्थी

-----------

हयातीचा दाखला साधा-सोपा

नागरिकांना हयातीचा दाखला देण्यासाठी बँकेतील अर्ज साधा-सोपा आहे. परंतु अनुदान सुरू ठेवण्यासाठी हयात असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर हे दाखले आपल्या बँकेत जमा करावे.

- संजय तेली, उपजिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा

Web Title: Helping the elderly to prove they are alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.