सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा: सुनीता कोलते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:33+5:302021-02-05T05:11:33+5:30

सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा आहे, असे प्रतिपादन पुरंदर तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनीता कोलते यांनी केले. ...

Helping the common man is the true service to the country: Sunita Kolte | सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा: सुनीता कोलते

सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा: सुनीता कोलते

सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा आहे, असे प्रतिपादन पुरंदर तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनीता कोलते यांनी केले.

भिवरी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे - गराडे काँग्रेस जि.प. गटाचे अध्यक्ष भाऊसाहेब दळवी मित्रपरिवारांच्या वतीने व भारती विद्यापीठ मेडिकल फाऊंडेशन संचलित पुणे धनकवडी येथील भारती आयुर्वेद हाँस्पिटलच्या सौजन्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोलते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी सरचिटणीस गणेश जगताप होते.

यावेळी प्रहार क्रांती संघटना प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे,माजी सरपंच शहाजी लोणकर ,माजी उपसरपंच जगन्नाथ कटके,हनुमंत कामठे ,माऊली दळवी,संभाजी नाटकर,बाळासाहेब नाटकर,प्रकाश कटके ,गणेश दळवी, हनुमंत मानकर , दत्तात्रय ताम्हाणे, हरिदास दळवी,सचिन दळवी,नाना येळवंडे उपस्थित होते.

या शिबीरात भिवरी पंचक्रोशीतील १२६ नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब येळवंडे यांनी केले. सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. तर आभार राजेंद्र ताम्हाणे यांनी मानले.

२५ गराडे

भिवरी (ता.पुरंदर) : येथे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब दळवी मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर

(छायाचित्र - सुनील लोणकर )

टिप - टिप - दै.लोकमतचे भाऊसाहेब दळवी मिञपरिवार नियमित जाहिरातदार आहेत.कृपया बातमी फोटोओळीसह सविस्तर घ्यावी ही विनंती आहे.

Sent from my Samsung Galaxy smartphone.

Web Title: Helping the common man is the true service to the country: Sunita Kolte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.