विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: November 2, 2015 01:09 IST2015-11-02T01:09:09+5:302015-11-02T01:09:09+5:30
पुण्यातील गुजराती शिक्षण प्रचारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य या संकल्पनेतून दुष्काळग्रस्तांना मदत करून खारीचा वाटा उचलला

विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
पुणे : पुण्यातील गुजराती शिक्षण प्रचारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य या संकल्पनेतून दुष्काळग्रस्तांना मदत करून खारीचा वाटा उचलला. या माध्यमातून उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना ७ हजार किलो धान्याची मदत दिली जाणार आहे. या उपक्रमात शिक्षक व पालकांनी सहभाग घेत दुष्काळग्रस्तांकरिता मदतीचा हात दिला.
या वेळी खडक पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते अतुल भिंगारकर, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. जाधव म्हणाले,
आपली दिवाळी चांगली
करायची असेल तर
दुष्काळग्रस्तांची दिवाळी आनंदात साजरी व्हायला हवी, असा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी मदत केली आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना ठेवून विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्तांना दिलेली मदत कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांकडून समाजातील इतर व्यक्तींनी प्रेरणा घेतली पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका लता लहघानिया यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. गुजराती माध्यमाच्या मुख्याध्यापिका छाया नेवसे आणि मीनाक्षी रावत यांनी आभार मानले.