दुष्काळग्रस्तांना ‘नाम’ची मदत

By Admin | Updated: May 11, 2016 00:22 IST2016-05-11T00:22:02+5:302016-05-11T00:22:02+5:30

नाम फाउंडेशन पिंपरी चिंचवडतर्फे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे ३४० कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले.

Help with 'Names' for drought-hit people | दुष्काळग्रस्तांना ‘नाम’ची मदत

दुष्काळग्रस्तांना ‘नाम’ची मदत

भोसरी : नाम फाउंडेशन पिंपरी चिंचवडतर्फे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे ३४० कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी अनेक महिलांनी दुष्काळाचे भयाण संकट असताना मिळालेल्या या मदतीबद्दल भावोद्गार काढून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
उपक्रमासाठी शहरातील अनेक युवक, उद्योजक एकत्र आले असून, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. शहरातील विविध भागांतून थोडेथोडे धान्य गोळा करून हे सर्व धान्य घोडेगाव येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच परीगाबाई मचे, प्रा. फुलसिंग पांडे, रामदास घोडके यांनी नामच्या टीमचे स्वागत केले. अमित गोरखे, तुषार शिंदे, डॉ. महेश पाटील, धनंजय शेडबाळे, लाला माने, अजय लंके, शलाका आसलेकर, आशा नेगी, अजय रसाळ, हरिभाऊ तापकीर, सूर्यकांत भारसवडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Help with 'Names' for drought-hit people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.