मायमाऊली वृद्धाश्रमास मदत अन् डॉ. थोपटे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST2021-03-15T04:10:34+5:302021-03-15T04:10:34+5:30
धनकवडी : ह्रदयरोगतज्ज्ञ आणि हार्ट बिट फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. ओंकार थोपटे यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मायमाऊली केअर सेंटरमधील अंथरुणाला ...

मायमाऊली वृद्धाश्रमास मदत अन् डॉ. थोपटे यांचा सन्मान
धनकवडी : ह्रदयरोगतज्ज्ञ आणि हार्ट बिट फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. ओंकार थोपटे यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मायमाऊली केअर सेंटरमधील अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आर्थिक मदत केली, तसेच धान्य वाटप केले.
डॉ. थोपटे, हार्ट बिट फौंडेशनच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा मोफत देत असतात. त्यांनी आतापर्यंत दहा हजार शस्त्रक्रिया विनामोबदला केल्या आहेत. या वेळी डॉ. थोपटे म्हणाले, "महाशिवरात्रीच्या निमित्ताने वृद्धाश्रमाला मदत करण्याची संधी मला मायमाऊली केअर सेंटरने दिली. त्यांना भविष्यात लागणाऱ्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवाही मी मोफत पुरवणार आहे." या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील व विशाल वरुडे पाटील यांनी डॉ. थोपटे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
---------------
फोटो - वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. ओंकार थोपटे यांना सन्मानित करताना अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील व विशाल वरुडे पाटील.