शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटमुळे वाचले त्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:05 IST

पिंपळे सौदागर येथील घटना : सुरक्षेची दक्षता घेतल्याने टळली दुर्घटना

रहाटणी : देव तारी त्याला कोण मारी, याची प्रचिती मंगळवारी आली़ दुपारी एकची वेळ, शिवार चौकातील सिग्नल सुरू झाला म्हणून दुचाकीस्वाराकडून अचानक समोरचा ब्रेक लागला. अन् काही कळण्याच्या आत दुचाकी पलटी झाली. मागून येणारी वाहने प्रसंगावधान राखत जागेवर थांबली़ मात्र हेल्मेट डोक्यात होते म्हणून तो वाचला.

सुजित भंडारे (वय ३२, रा. आंबेगाव, पुणे) हा तरुण कामासाठी चाकण येथे गेला होता़ चाकणवरून परत येत असताना तो शिवार चौकातल्या शिवाजी चौकात आला. पिवळा दिवा सुरू असताना आपण जाऊ असे त्याला वाटत असतानाच लाल दिवा लागला आणि या तरुणाने मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता दुचाकीचा पुढील ब्रेक दाबला़ त्यामुळे दुचाकी जागेवरच पलटी होऊन तो सुमारे पंधरा ते वीस फूट फेकला गेला़ मात्र त्याच्या डोक्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही़ कारण त्याने हेल्मेट होते़

काही तरुणांनी व चौकात ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस वॉर्डन यांनी त्याला उचलून बाजूला घेतले व त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला हेल्मेट होते म्हणून मी वाचलो, अन्यथा माझे काही खरे नव्हते़ हा प्रकार ह्या व्यक्ती सोबत एकदा नव्हे तर दोनदा घडलेला आहे....तर सुजित आज जिवंत राहिला नसतापिंपळे सौदागर येथील शिवार चौक नेहमीच रहदारीचा असतो. ज्या वेळेस सुजित दुचाकीवरून पडला. त्या वेळेस त्याच्यामागून अनेक वाहने वेगात येत होती. मात्र प्रसंगावधान राखत अनेक वाहनचालकांनी वाहनाच्या गतीवर ताबा मिळविला म्हणून सुजित वाचू शकला़ जर मागच्या गाड्यांचे ब्रेक लागले नसते तर सुजित आज जिवंत नसता, हे या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांनीदेखील वेग व मनावर ताबा ठेवण्याची अत्यंत गरज असल्याचे या घटनेवरून दिसून आले. 

नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध करण्यापेक्षा हेल्मेटचे फायदे जाणून घ्यावेत़ जर माझ्या डोक्यात हेल्मेट नसते, तर मला प्राणाला मुकावे लागले असते.- सुजित भंडारे

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस