शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कमाल करता राव; कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून गेलं 'ई-चलन', पुण्यातील चमत्कारिक प्रकार

By प्रमोद सरवळे | Updated: September 30, 2021 15:55 IST

आपल्याकडे असलेल्या गाडीवर कोणता दंड आहे का? असेल तर तो किती? हे तपासण्यासाठी पुणेकरांची तारांबळ उडाली आहे

ठळक मुद्देअचानक आलेल्या नोटिसांमुळे पुणेकरांचे धाबे दणाणले आहेत.किती रुपयांचं चलन आले आहे हे पाहण्यासाठीही अनेकांची तारांबळ उडाली आहे.

पुणे: वाहतुक विभागाच्या धडक कारवाईनंतर पुणेकरांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वाहतुकीचे नियम तोडल्याने शहरातील लाखो नागरिकांना ई-चलन दंड पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये बऱ्याच जणांनी दंड न भरल्याने अनेकांना न्यायलयाकडून नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. या अचानक आलेल्या नोटिसांमुळे पुणेकरांचे धाबे दणाणले आहेत. आपल्याकडे असलेल्या गाडीवर कोणता दंड आहे का? असेल तर तो किती? हे तपासण्यासाठी पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.

अशात पुण्यामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. झालं असं की, वाहतुक विभागाने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे अनेकांनी आपल्या नावावर किती दंड आला आहे हे पाहण्यास सुरवात केली. यामध्ये शहरातील एका व्यक्तीच्या चारचाकीला हेल्मेट न घातल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील एका व्यक्तीकडे मारुती सुजूकीची 'एस एक्स 4' ही कार आहे. वाहन मालकाला 9 जानेवारी 2019 हा दंड करण्यात आला होता. नागरिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा येत असल्याने गाडी मालकाने त्यांच्या गाडीवरील दंड चेक केल्यानंतर त्यांना हेल्मेट न घातल्याने 500 रुपये आणि पोलिस नियम तोडल्याचे 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे गाडी मालकाने कारला वाहतुक विभागाने हेल्मेटचा दंड कसा लावला याबद्दल प्रश्न केला आहे.

असा प्रकार कशामुळे झाला?यापूर्वीही अनेक चारचाकी, कार, रिक्षांना हेल्मेटचा दंड आला आहे. वाहनांचे नंबर खराब झालेले किंवा आकड्यांचा रंग गेलेला असतो त्यामुळे कधीकधी दंड होणाऱ्या वाहनांचा नंबर सिस्टममध्ये टाकताना चूका होतात. तसेच कधीकधी चोरीच्या वाहनांवरही एखाद्या गाडीचा नंबर टाकल्यानंतर तो नंबर ज्या गाडीमालकाच्या नावे आहे त्या व्यक्तीला दंडाचे चलन जाते, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.

जर चलनाबद्दल काही तक्रारी असतील तर प्लेस्टोअरवरून MahaTraffic हे अॅप डाउनलोड करा. हे अॅप उघडल्यानंतर तुम्हाला Grievance असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार तिथे दाखल करू शकता.-राहूल श्रीरामे (पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे)

दहा लाख वाहनचालकांना नोटिसा- ‘लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘सामा’ या खासगी कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे. या कंपनीला वाहतूक विभागाशी जोडून देण्यात आले आहे. सध्या वाहतूक विभागाकडे १७ लाख वाहनचालकांचा डेटा आहे. मात्र, त्यातील पाच लाख लोकांचे मोबाइल क्रमांक नाहीत. त्यामुळे दहा लाख वाहनचालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.’

- प्रताप सावंत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस