मापुस्करांच्या कर्तृत्वाला सलाम!'
By Admin | Updated: January 26, 2017 00:07 IST2017-01-26T00:07:15+5:302017-01-26T00:07:15+5:30
सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला

मापुस्करांच्या कर्तृत्वाला सलाम!'
देहूगाव : सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. संतांचा पर्यावरणवाद आणि स्वच्छतेचे कार्य सर्वदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम मापुसकरांनी केले. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरासाठी प्रथमच पद्मश्रीचा मान मिळाला आहे. मापुस्करांच्या कर्तुत्वाला सरकारने पुरस्कार देऊन सलाम केला आहे. त्यामुळे देहूनगरी आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. मापुस्कर यांचा जन्म २२ जानेवारी १९३५ रोजी कोकणातील वाकेड गावामध्ये झाला होता. स्वातंत्र्यानंतर देश नवनवीन आव्हानांचा सामना करीत असताना देशातील सुमारे ७५ टक्के जनता दारिद्र्य, आजार आदीने पछाडलेली होती. अशा परिस्थितीत डॉ. मापुस्कर यांनी १९५९ मध्ये श्रीक्षेत्र देहूगाव येथे वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला.
त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले. गाव पातळीवर शौचालय बांधकाम समितीची स्थापना केली. ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले.