शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; वाऱ्याचा वेग ताशी 65 -70 किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 17:37 IST

झाडे, फ्लेक्स, उन्मळून पडली तर काही ठिकाणी भागात पाणी शिरले

पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पुणे शहरात तसेच  जिल्ह्यातीलघाटमाथ्याच्या परिसरात दिसत आहे. शहरात दुपारी १२ वाजेपर्यंत ४५ किमी वेगाने वारे वाहत असून त्याचा वेग दुपारनंतर ताशी ७० किमीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.शहरात सायंकाळी ४ नंतर वार्‍याचा वेग वाढला असून ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशामक दलाच्या दूरध्वनी सातत्याने खणखणत आहे. अग्निशामक दलाला इतके फोन येत असल्याने अनेकाना फोन लागत नसल्याचा अनुभव येत आहे.

शहरात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली असून दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. आज सकाळी साडेअकरा  वाजेपर्यंत शहरात ४७.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.निसर्ग चक्रीवादळ हे आज दुपारी अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर धडकले़ या चक्रीवादळाच्या कक्षेत पुणे जिल्हाही येत असून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.* पुणे सातारा रोड शंकर महाराज मठा समोर विश्वेश्वर बँकेच्या  इमारतीवरील होर्डिंग बिल्डिंग वरून डायरेक्ट खाली कोसळले. नशिबाने जीवितहानी नाही झाली पण दुचाकी यांचे प्रचंड नुकसान झाले.
* वडगाव शेरी येथील उज्वल गाडर्न या सोसायटीची सीमा भिंत पावसामुळे काल रात्री कोसळली.* या पावसामुळे शहरात ९ ठिकाणी पाणी साचले आहे़ त्यात गंगाराम कर्णे हॉस्पिटल, येरवडा, साडेसतरा नळी हडपसर, ससाणेनगर, डि मार्ट, हडपसर, टिंगरेनगर लेन नं ११/८, लक्ष्मीनगर, येरवडा, डि़ वाय पाटील पार्क, लोहगाव, ससाणेनगर, शांती रक्षक सोसायटी, येरवडा, अग्रलवाल हॉस्पिटल चंदननगर या ठिकाणी पाणी साचल्याने लोकांची मोठी पंचाईत झाली आहे.* वडगाव शेरी परिसरातील सोमनाथनगर, सुप्रभात सोसायटी, शुभम, गार्डेनिया, उज्वल गार्डन, आनंद हाईट या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले.* शहराच्या अनेक भागात झाडे पडली असून मंगळवारी रात्रीपासून दुपारी १२वाजेपर्यंत शहरात १७ ठिकाणी झाडे पडली आहे़ त्यात प्रामुख्याने कोथरुड अग्निशामन केंद्रासमोर, कस्तुरबा हॉस्पिटल, विश्रांतवाडी, स्वारगेट पोलीस लाईन, हयात हॉटेलसमोर, विमाननगर, रामटेकडी, हडपसर, एरंडवणा, नळस्टॉप, पंचवटी, पाषाण, पिंपळेवस्ती, मुंढवा, सॅलसबरी पार्क, केशवनगर, मुंढवा,कोरेगाव पार्क लेन नंबर ५, मनपा ७ नंबर कॉलनी, गंज पेठ, मेंटल कॉर्नर, येरवडा़* अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन साठलेल्या पाण्याचा उपसा पंपाद्वारे केला. ज्या भागात झाडे तसेच फांद्याा कोसळण्याच्या घटना घडल्या. जवानांकडून झाडयांच्या फांद्या हटविण्यात आल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.* महापालिकेचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित - महापालिकेच्या  मुख्यइमारतीतील नियंत्रण कक्ष तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २५ अधिकारी, कर्मचाºयांचे पथक पावसामुळे उद्भवणाºया कोणत्याही संकटाला तयार ठेवण्यात आले आहे.नागरिकांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे़*आपत्कालीन व्यवस्थापन विभाग : २५५०१२६२, अग्निशामक दल १०१

शहरात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पडलेला पाऊसशिवाजीनगर ४७.६पाषाण ५१.२सहकारनगर ४४.१लोहगाव ९७.३

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ