शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 01:06 IST

पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. हवामान खाते आणि महापालिकेने स्पष्ट केले असून शहरात काही समाजमाध्यमांवर ढगफुटीची अफवा पसरल्याचे समजत आहे.

पुणे : पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. हवामान खाते आणि महापालिकेने स्पष्ट केले असून शहरात काही समाजमाध्यमांवर ढगफुटीची अफवा पसरल्याचे समजत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडवली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. उपनगर भागातील बरेच रस्ते पाण्याखाली असून वाहतूक थांबवण्यात आली आहे.

याच वेळी समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियावर ढगफुटी झाल्याची आणि होऊ शकते असा मेसेज व्हायरल झाला आहे. मात्र यात काहीही तथ्य नसून बुधवारी झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचे हवामान खात्याच्या डॉ अनुराग कश्यपी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, 'शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी याला ढगफुटी म्हणता येणार नाही'.

दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक यांनीही त्यासंबंधीचा संदेश जारी केला आहे. त्या म्हणाल्यात की, पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये'.

शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती (रात्री १ वाजता )- वारजे पुलाच्या खाली पाणी घुसले, वारजे ते कोथरुड रस्ता बंद.- सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता बंद  आहे. गजानन महाराज मठ ते पुढेपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.- कोल्हेवाडी परिसरातदेखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. - बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन फूट पाण्यातून  जाताना चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत.- दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत.- बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द गंभीर परिस्थिती, 

-कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर