शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Video : पावसाने पुणेकरांना पुन्हा झोडपले; अनेक घरात पाणी शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 11:11 IST

शिवाजीनगर ४२.४, लोहगाव ५६.४, पाषाण ३२, कात्रज ३६, कोथरुड ३८ मिमी पाऊस

पुणे : मध्यरात्री १२ वाजता सुरु झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांना रात्रभर झोडपून काढले. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील घरात पाणी शिरले. कात्रज आणि लोहगाव  भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे आंबिल ओढ्याला पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. रात्रभर झालेल्या या पावसाने येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड भागातील घरामध्ये पाणी शिरले होते. 

रात्रभर झालेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत ४२.४ मिमी इतकी नोंद झाली आहे़ लोहगाव ५६.४, पाषाण ३२ मिमी पावसाची नोंद झाली. आशय मेजरमेंटने दिलेल्या माहितीनुसार कात्रज ३६, कोथरुड ३८ मिमी पाऊस झाला आहे. लोहगाव जकात नाक्याजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सकाळी साडेसहा वाजता कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाने या पाण्यात बस घातली. मात्र, पाण्याच्या मध्येच बस बंद पडली. ती काही केल्या सुरु होईना. या बसमध्ये २३ जण अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवान रघुनाथ भोईर, महेश मुळीक, उमेश डगळे, विलिन रावतू, सोपान पवार यांनी या कामगारांना रश्शीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर ट्रॅक्टर लावून ही बस पाण्याबाहेर काढण्यात आली.

लोहगाव, येरवडा, नगर रोड परिसरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. सकाळी लवकर कामाला जाणारे कामगार, स्कुल बस या पाण्यातून आपल्या गाड्या घालून जाताना दिसत होते. २५ सप्टेबरला आलेल्या पुरात आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या अनेक सोसायट्यांच्या सीमा भिंती कोसळून पाणी घरांमध्ये शिरले होते. त्यात पद्यावती भागातील गुरुराज सोसायटीचे मोठे नुकसान झाले होते. आजही पहाटे गुरुराज सोसायटीमध्ये पुन्हा पाणी शिरले. सोसायटीतील ५ इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. 

म्हात्रे पुलावरुन कर्वे रोडला येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा रस्ता बंद करावा लागला होता़ पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने पाणी ओसरले.

कात्रज येथे रात्री ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे कात्रज तलाव व परिसरातील पाणी आंबिल ओढ्याला वाहून येऊन ओढ्याला पूर आला.

टॅग्स :floodपूरPuneपुणे