पोखरी घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:55+5:302021-07-23T04:08:55+5:30
लोकमत न्युज नेटवर्क: डिंभे: मंचर-भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. या ...

पोखरी घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळली
लोकमत न्युज नेटवर्क:
डिंभे: मंचर-भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. या मुळे हा रस्ता वहातुकीसाठी ठप्पा झाला होता. रात्रीच्या वेळी दरडी कोसळल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी नुकतेच बांधकाम केलेला हा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेल्याने मंचर-भीमाशंकर या महामार्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. डिंभे धरण पाणलोटक्षेत्रात संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजिवन विष्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून राडारोडा रस्त्यावर वाहून आल्याने वहातुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागील २४ तासात या भागात १२९ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. आज पर्यंत या भागात एकुण ४६७ मी.मी. एवढा पाऊस झाला आहे. काल रात्री पासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे रस्त्यावर पाणी आले असून नद्या नाले ओसंडून वहात आहेत. सुरू झालेल्या पावसामुळे खोळंबलेली भात लागवडीची कामे सुरू होण्यास मदत होणार झाली असली तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेतीचे बांध फुटून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने मंचर-भीमाशंकर या राज्य महामार्गावरील पोखरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. नुकतेच उन्हाळ्यात या रस्त्याचे नव्याने काम झाले होते. तर वरील बाजूने संपुर्ण घाट रस्त्यात गटारीचे काम करण्यात आले होते. मात्र, काल झालेल्या पावसामुळे कोसळलेल्या दरडीमुळे अनेक ठिकाणी गटारीचे काम पावसाबरोबर वाहून गेले. गोहे गावाजवळील पहील्या वळणावर रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. साईड पट्याच वाहून गेल्याने हा रस्ता पुन्हा वहातुकीसाठी धोकादाय झाला आहे. गुरूवारी सकाळ पासून या रस्त्यावरची वहातक खोळंबली होती. कोरोना नंतर नुकत्याच भीमाशंकर कडे जाणाऱ्या एस.टी बस सुरु झाल्या आहेत. भीमाशंकर येथे मुक्कामी आसणाऱ्या बसगाड्या सकाळी परतीच्या प्रवासात होत्या. मात्र पोखरी घाटात येताच पुणे-भीमाशंकर पनवेल भीमाशंकर, पाटण-पोखरी पुणे या बसेस घाटात अडकून पडल्या. तर अनेक खाजगी प्रवासी वहानांनाही घाटात खोळंबून रहावे लागले होते. घटनेची माहीती मिळताच बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने दरडी हरविण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत हा रस्ता वहातूकीसाठी खुला करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात आंबेगांव तालुक पंचायत समिती सभापती संजय गवारी , तहसिलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी पोखरी घाटात भेट देवून रस्ता तातडीने खुला करून देण्यासाठी सुचना देण्यात आल्या होत्या.
सोबत फोटो. - २७ जुलै२०१९ डिंभे पी १
ओळी - पी१आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाची संततधार सुरू असून काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे पोखरी घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने वहातुक ठप्प झाली होती.(छायाचित्र- कांताराम भवारी)
पी२- अतिवृष्टीमुळे पोखरी घाटातील रस्ता वाहून गेला, संरक्षक भींतीही वाहून गेल्याने मंचर-भीमाशंकर या राज्यामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (छायाचित्र- कांताराम भवारी)