शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पुणे : खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:19 IST

पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे, दि. 20 - पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे.  पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुळा नदीहीही दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मंगळवार (19 सप्टेंबर) पासून पुन्हा एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली.  पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून, खडकवासला धरणातून मुठेत २३ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.  पावसाची संततधार सुरूच असून, ती अशीच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची गरज भासू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.मंगळवारपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीत वाढ झाली आहे. मुठा नदीतून काल रात्रीपासून टप्याटप्याने पाणी वाढविण्यात आले. सध्या २३ हजार ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव धरणातूनही सोडलेले पाणी खडकवासल्यात येत आहे. धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी जमा देखील होते आहे. त्यामुळे ही संततधार अशीच सुरु राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे.

मुळा नदीतही मुळशी धरणातून पाणी येत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २०२ २०५५०१२६९ / २५५०६८०० / २५५०६८०१ / २५५०६८०२ / २५५०६८०३/ २५५०६८०४ या क्रमांकावर, तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी १०१ या क्रमांकावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी १०० या क्रमांकावर तसेच ०२० २५५०११३३ / २५५०११३० या क्रमांकावर सुरक्षा रक्षकांच्या मदतीसाठी संपर्क करता येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू आहे.