लोणावळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
By Admin | Updated: June 25, 2017 08:11 IST2017-06-25T08:11:15+5:302017-06-25T08:11:15+5:30
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात शनिवारी रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी

लोणावळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 25 - लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात शनिवारी रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले डोंगरभागातील धबधबे आज पुर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. शहरात अनेक ठिकाणी नाले सफाईची कामे पुर्ण न झाल्याने अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. शनिवारची आख्खी रात्र पावसाने परिसर झोडपून काढला. पावसाचा जोर असाच दिवसभर कायम राहिल्यास पर्यटकांना आकर्षित करणारे भुशी धरण भरण्याची शक्यता आहे. सलग सुट्टयांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी शहरात आलेल्या पर्यटकांना हा पाऊस एक पर्वणी ठरला अाहे. पर्यटक मनमुरादपणे या पावसात चिंब भिजण्याचा अानंद घेत आहेत.