शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

भारनियमनाने सिंचन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:44 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे. सध्या चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने ‘पाणी असूनही, घसा कोरडाच’ अशी दयनीय अवस्था येथील शेतकऱ्यांचीनिर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाºया बळीराजाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये कृषीपंपाच्या विजेचे मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. विशेष म्हणजे भारनियमन सोडून आलेली वीज वारंवार खंडित केली जात आहे. सलग होणाºया भारनियमनामुळे हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चालू रब्बी हंगामात उन्हाच्या काहिलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. त्यातच कांद्याच्या लागवडीही सुरू आहेत. मात्र विजेच्या समस्येमुळे मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही.वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या भावनांचा अंत न पाहता रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन कमी करून किमान दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सलग चौदा ते सोळा तासांहून अधिक वेळ नित्याचे भारनियमन केले जात आहे. त्याचा रब्बी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होतआहे, तर उपलब्ध विजेच्या वेळेतही वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे विद्युत पंप नादुरुस्त होऊन शेतकºयांचे आर्थिक नुकसानहोऊ लागले आहे.खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिवसाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत रात्रीचे पीक सिंचन शेतकºयांना करावे लागत आहे.कोयाळी, मरकळ, मोहितेवाडी, साबळेवाडी, चिंचोशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली शेतात जात आहेत.दररोजचे वाढते भारनियमन तसेच वारंवार होत असलेल्या खंडित विजेला आम्ही पूर्णत: कंटाळलो आहोत. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. सध्या कांदा लागवडीसाठी विजेची जास्त गरज आहे. भारनियमन कमी करावे आणि तेही रात्रीचे करावे.- संतोष आवटे, माजी सरपंच, शेलगाव.