शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 21:49 IST

प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी..

राजगुरूनगर : पुर्व भागात दावडी या परिससरात आज (दि ३० ) दुपारी ५ वाजता जोरदार पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. नुकताच कांदा लागवड केलेल्या कांदापिकांना या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. त्याचबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दावडी गावात पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.      दावडी परिसरातील जाधवदरा, बोञेवस्ती, होरे वस्ती, म्हसाडेवस्ती, कान्हुरकरमळा या भागात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सुमारे एक तास पडत असलेल्या पावसाने शेतातील कांदा पिक वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारबंळ उडाली. त्याचबरोबर शेतात पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.     ओढे नाल्यांना पहिल्यांदाच पुर आला. नवीन पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांची गैरसोय टळली. दावडी परिसरात गेल्या काही वर्षात पहिल्यादांच असा पाऊस झाले असल्याचे जाणकार ग्रामस्थांनी मत व्यक्त केले, असे जाधवदरा येथील शेतकरी आबासाहेब घारे , दावडी गावचे माजी सरपंच सुरेश डुंबरे यांनी सांगितले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी, कांदा लागवड करावी लागणार आहे. प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस