शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दोन आठवडे पावसाची दडी कायम, कधी होणार मुसळधार? हवामान विभागाचा अंदाज

By नितीन चौधरी | Updated: August 25, 2023 16:35 IST

बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेल्या प्रणालीमुळे देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे...

पुणे : राज्यात पावसासाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे ठराविक जिल्ह्यांमध्येच हलका पाऊस पडत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्या पंधरवड्यात मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडेल. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र, राज्यात सर्व दूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेल्या प्रणालीमुळे देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. याचा थेट परिणाम खरीप पिकांवर तसेच धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “येत्या सात दिवसांमध्ये राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात बहुतेक आणि हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हा पाऊस सरासरीच्या कितीतरी कमी असेल त्यानंतरच्या आठवड्यात देखील हीच स्थिती कायम राहील मात्र त्यात थोडी सुधारणा होऊ शकते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात मान्सूनला अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सबंध राज्यभर सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल.”

राज्यात २५ ऑगस्टपर्यंत सरासरी ७६९.१ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत ६६२.३ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या हा पाऊस ८६.१ टक्के इतका आहे.

एक जूनपासून २३ ऑगस्टपर्यंतचा पाऊस (सरासरीपेक्षा टक्क्यांत)

पालघर २४, ठाणे २६, मुंबई ३१, रायगड १४, सिंधुदुर्ग ३, कोल्हापूर -१४, सांगली -४४, सातारा -३७, पुणे -१६, सोलापूर -२५, नगर -३३, नाशिक -७, धुळे -२०, नंदूरबार -१९, जळगाव -११, संभाजीनगर-३१, जालना -४६, बीड -३२, धाराशिव -१९, परभणी -२१, हिंगोली -३२, लातूर -४, नांदेड २७, बुलढाणा -१९, अकोला -२७, वाशिम -१५, अमरावती -३१, यवतमाळ १०, वर्धा -८, नागपूर -५, चंद्रपूर -४, भंडारा २, गोंदिया -१५, गडचिरोली -१.

पुढील दोन आढवडे चांगल्या पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार नियोजन करावे. कापूस पिकाला एक पाणी द्यावे. तर सोयाबीन पिकात एक सरी आड आंतरमशागत करून जमीन भुसशुशीत करावी. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहील.- डॉ. अनुपम काश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज, भारतीय हवामानशास्त्र विभाग

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस