पैसे काढण्यासाठी भर उन्हात रांगा
By Admin | Updated: November 14, 2016 03:05 IST2016-11-14T03:05:37+5:302016-11-14T03:05:37+5:30
पैसे काढण्यासाठी भर उन्हात रांगा

पैसे काढण्यासाठी भर उन्हात रांगा
उंड्री : रविवारी सुटीच्या दिवशी उंड्री परिसरातील बँकांमधून पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी बँकंसोडून सर्वांना सुटी असल्याने व सोमवारी बँक बंद असल्याने नागरिकांनी काल बँकेत तोबा गर्दी केली. इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी बँकांसमोर जास्त लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी तर या रांगा रस्त्यावर आल्या होत्या. बऱ्याच बँकांसमोर लोक ३-४ तास भर उन्हात उभे होते. या परिसरात बांधकाम मजुरांची संख्या जास्त आहे. आज रविवारी या मजुरांना सुटी असल्याने त्यांचे प्रमाण लक्षणीय होते.
बँकांतून पैसे काढण्यासाठी लोकांनी सकाळी ७ वाजल्यापासनूच रांगा लावल्या होत्या. जेणेकरून पैसे लवकर भरता येतील किंवा काढता येतील. व्यावसायिकसुद्धा रोजचा गल्ला भरण्यासाठी ३-४ तास वेळ लागत होता. त्यात उद्या बँका बंद असल्याने लोकांनी आज जास्त प्रमाणात गर्दी केली होती.
काही ठिकाणी फक्त दोन हजार मिळत असल्याने काही नागरिक बँक प्रशासनाशी वाद घालत होते, तर ३-४ तास रांगेत उभे राहून फक्त दोन हजार हातात मिळाल्यावर काही नागरिकांच्या चेहऱ्यावर असमाधान व्यक्त होत होते.
(वार्ताहर)