समाविष्ट गावांची उद्या आयुक्तांकडे सुनावणी
By Admin | Updated: November 11, 2014 00:21 IST2014-11-11T00:21:52+5:302014-11-11T00:21:52+5:30
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणा:या शहरालगतच्या 34 गावांची येत्या बुधवार(दि. 12)पासून विभागीय आयुक्त विकास देशमुख सुनावणी घेणार आहेत.

समाविष्ट गावांची उद्या आयुक्तांकडे सुनावणी
पुणो : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणा:या शहरालगतच्या 34 गावांची येत्या बुधवार(दि. 12)पासून विभागीय आयुक्त विकास देशमुख सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीनंतर आयुक्त अंतिम अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले.
पुणो महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट होणा:या 34 गावांसाठी नगर विकास विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानंतर नागरिकांकडून याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्तांना प्राधिकृत केले आहे. त्यामुळे येत्या 12 ते 15 नोव्हेंबर रोजी आयुक्त समाविष्ट गावांबाबत सुनावणी घेणार आहेत.
या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात मौजे मांजरी बुद्रुक, शिवणो, निंबाळकरवाडी, नांदोशी, उरळी देवाची, केशवनगर, फुरंसुगी या गावांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे. तर, दुस:या टप्प्यात मौजे वाघोली, मेंगडेवाडी या गावांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. यासाठी संबंधित सर्व हरकतदारांना वैयक्तिक नोटिसा देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)