आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याने लस घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:30+5:302021-02-20T04:30:30+5:30
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याने तसेच फ्रंटलाईन वर्करमध्ये पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये नाव आल्याने लस ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याने लस घेतली
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याने तसेच फ्रंटलाईन वर्करमध्ये पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये नाव आल्याने लस घेतली असल्याची माहिती सभापती दिनकर सरपाले यांनी दिली. सभापती दिनकर सरपाले म्हणाले, वेल्हे तालुक्यात सध्या १०० लोकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले असताना प्रत्यक्षात मात्र १०-२० लोक लस घेण्यासाठी येत आहेत. परिणामी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी धारेवर धरले जात आहे. एका कुपीमध्ये १० लोकांना लस देण्यात येते. परंतु प्रत्यक्षात मात्र दोनच लोक लस घेण्यासाठी येत आहेत. उघडलेल्या कुपीमधील लस ठराविक वेळेनंतर वाया जात आहे. कोरोनाच्या काळात प्रशासनासोबत सभापती, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केले आहे. असे असताना देखील या लोकांना का लस दिली जात नाही, असा सवालदेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. तालुक्यामध्ये लसीकरणाची भीती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शासकीय कर्मचारी लस घेण्यास भीतीपोटी टाळाटाळ करीत आहेत. सभापती दिनकर सरपाले यांनी लस घेऊन लसीकरणासाठी न येणाऱ्या लोकांना एक चांगला संदेश जाईल, असे म्हटले आहे. माझ्यासोबत चार जणांनी नोंदणी केली आहे. फक्त मी एकट्यानेच लस घेतली असल्याचे सभापती दिनकर सरपाले यांनी यावेळी सांगितले.