अंगणवाडी सेविकांना आरोग्यसंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:11 IST2021-03-06T04:11:36+5:302021-03-06T04:11:36+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या उपायुक्त संध्या नगरकर यांच्या हस्ते आरोग्यसंचांचे वितरण झाले. प्रसंगी मुकुल माधव फाऊंडेशनचे प्रतिनिधी बबलु ...

अंगणवाडी सेविकांना आरोग्यसंच
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या उपायुक्त संध्या नगरकर यांच्या हस्ते आरोग्यसंचांचे वितरण झाले. प्रसंगी मुकुल माधव फाऊंडेशनचे प्रतिनिधी बबलु मोकळे, यास्मिन शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी पी. बी. शिर्के, विजय तावरे, एस. एस. टिळे आदी उपस्थित होते.
नगरकर म्हणाल्या, " कोरोना काळात सर्वच सेविकांनी उल्लेखनीय काम केले आहे. महिला दिनानिमित्त त्यांच्या कामाचे कौतुक केले जातेय, याचा आनंद वाटतो. अंगणवाडी सेविकांनी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी सकारात्मक विचारसरणीवर चालते. अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड ताकद आहे."
बबलू मोकळे म्हणाले, "मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या पुढाकारातून समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करायला उत्सुक असते. पोषण आहारासाठी फाउंडेशन अनेक कार्यक्रम घेत आहे. महिलांचे सबलीकरण करणे हाच आमचा उद्देश्य आहे."
पायल हरणे यांनी प्रास्ताविक केले. कविता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. टिळे यांनी आभार मानले.